बिंदुसरा नदीपात्रावरील पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:50 IST2017-09-22T00:50:27+5:302017-09-22T00:50:27+5:30
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल प्रवासी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

बिंदुसरा नदीपात्रावरील पर्यायी पूल वाहतुकीसाठी खुला
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुल प्रवासी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून वाहनधारकांचे हाल थांबणार आहेत. दरम्यान, या पुलावरून अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे बिंदुसरा नदीला पुर आला. त्यामुळे महिनाभरापूर्वी पर्यायी पूल पुरामध्ये वाहून गेला. त्यामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अवजड वाहने मांजरसुंबा, गढीमार्गे वळविण्यात आली, तर प्रवासी वाहने मोंढा, खंडेश्वरी मार्गे वळविली. दरम्यान, प्रवासी वाहने शहरातून वळविल्याने सर्वत्र वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. छोटेमोठे अपघातही घडत होते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पर्यायी पुलाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी पुलाची पाहणी करुन आयआरबी अधिकाºयांकडून पूल वाहतुकीस मोकळा करण्यासंदर्भात पत्र मागविले. बुधवारी रात्री पूल खुला झाल्याच्या अफवेने अनेक वाहनांनी या रस्त्याने कूच केली होती. परंतु, वाहतूक शाखेला जिल्हाधिकाºयांचे आदेश नसल्याने या पुलावरुन एकाही वाहनाला प्रवेश दिला नाही. रात्रभर या ठिकाणी बंदोबस्त तैनात होता.
गुरुवारी सकाळी आठ वाजताच जिल्हाधिकाºयांकडून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात आदेश निघाले. वाहतूक शाखेच्या हाती पत्र पडताच त्यांनी हा पूल खुला केला. त्यामुळे शहरातून धावणारी वाहने या पुलावरुन गेली. पूल चालू झाल्यामुळे वाहनधारकांचे हाल काही प्रमाणात थांबणार आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.