शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
4
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
5
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
6
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
7
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
8
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
9
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
10
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
11
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
12
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
13
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
14
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
15
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
16
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
17
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
18
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
19
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
20
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...

'संभाजीनगर' नामांतराला विरोध; औरंगाबादेत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:14 IST

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत.

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. यास विरोध करत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, मराठवाडा अल्प संख्यांक विभागाचे अध्यक्ष हमद चाऊस यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे आहेत.

शिवसेनेतील बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारसमोरने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेत निर्णयांचा धडाका लावला. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ अशा नामांतरास मान्यता देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नामांतराच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आता ते केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत. मात्र, या नामकरणास स्थानिक कॉंग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे. औरंगाबादमधील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात राजीनामा सत्र सुरु केले आहे. आजवर कॉंग्रेसचा संभाजीनगर नामांतर करण्यास विरोध होता. परंतु, महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत आलेल्या संभाजीनगर नामांतर प्रस्तावास कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध दर्शवला नाही. नामांतराचा निर्णय होताच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी यास विरोधात दर्शवत आपले राजीनामे सादर केले आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत. यामुळे कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

या पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा- मोहम्मद हिशाम उस्मानी, अध्यक्ष-औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस - हमद चाऊस, मराठवाड़ा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग- मझर पटेल, जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग- शेख अथर, शहर जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग- सय्यद हमीद, शाहगंज ब्लॉक अध्यक्ष- आमेर अब्दुल सलीम, प्रदेश महासचिव युवक कॉंग्रेस- इद्रीस नवाब खान, प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस- मुजफ्फरखान पठाण, सचिव ,औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस- अखिल पटेल, मा.प्रदेश महासचिव युवक कॉंग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस- मसरूर सोहेल खान, मा.प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस- मोईन ईनामदार, मा.प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस व सदस्य औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस- हाजी मोईन क़ुरैशी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष, अल्पसख्यांक विभाग- इरफ़ान गुलाब खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष युवक कॉंग्रेस- लियाक़त पठाण, मा.अध्यक्ष औरंगाबाद पूर्व विधान युवक कॉंग्रेस व सदस्य ,औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस- शेख शफीक सरकार, महासचिव, शहर जिल्हा युवक कॉंग्रेस- शोएब अब्दुल्ला शेख, महासचिव, शहर जिल्हा युवक कॉंग्रेस- इंजीनियर मोहसीन खान, महासचिव, शहर जिल्हा युवक कॉंग्रेस- अनीस पटेल, प्रदेश महासचिव, किसान खेत मज़दूर कॉंग्रेस- शेख सगीर अहेमद, विधान सभा सचिव,युवक कॉंग्रेस- शेख फैज़, विधान सभा अध्यक्ष ,युवा कॉंग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस