शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देण्यास विरोध पण ऊस हवा, मराठवाड्यातून १२ लाख टन ऊस अहमदनगरमधील कारखान्यात

By बापू सोळुंके | Updated: November 13, 2023 13:16 IST

जायकवाडी प्रकल्पातील पाण्यावर मराठवाड्यातील शेतकरी उसाचे उत्पादन करतात. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे तब्बल ११ साखर कारखाने पैठण आणि गंगापूर तालुक्यातील उत्पादित उसावर चालतात. सुमारे १२ लाख टन ऊस हे कारखाने नेतात. केवळ राजकीय फायद्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करायचा आणि आर्थिक फायद्यासाठी मराठवाड्यातून ऊस न्यायचा; असा दुहेरी खेळ हे राजकारणी खेळत आहेत.

जायकवाडी प्रकल्पातील पाण्यावर मराठवाड्यातील शेतकरी उसाचे उत्पादन करतात. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये, यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी शासनावर दबावतंत्राचा वापर सुरू केला. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा जलसाठा असेल तर या धरणाच्या ऊर्ध्व भाग असलेल्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील समूह धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. या निर्णयानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी मराठवाड्यासाठी गोदापात्रात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. 

या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील ११ साखर कारखाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उसावर चालत असल्याचे ते विसरल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्याविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी आ. शंकरराव गडाख यांचा सोनई साखर कारखाना आणि कोल्हे यांचा संजीवनी साखर कारखाना आहेत. भेंडा साखर, केदारेश्वर साखर, गंगामाई साखर, कोपरगाव साखर, गंगासागर साखर, संगमनेर साखर, नगर तालुका साखर, कुकडी साखर, वृद्धेश्वर साखर यांचा प्रामुख्याने समावेश होतो .

... तर मराठवाड्यातील उसाला हात लावू नयेगंगापूर आणि पैठण तालुक्यातून किमान दहा ते बारा लाख टन ऊस नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जातो. जायकवाडीच्या पाण्याला राजकीय स्वार्थापोटी विरोध करायचा आणि आर्थिक फायद्यासाठी मात्र ऊस न्यायचा; असा दुहेरी खेळ राजकारणी साखरसम्राट खेळत आहेत. पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या कारखान्याने एक तर मराठवाड्यातील उसाला हात लावू नये आणि पैठण आणि गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस देऊ नये, असे आपले आवाहन आहे.- जयाजीराव सूर्यवंशी, संस्थापक, अन्नदाता शेतकरी संघटना

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी