श्रेयस तळपदे आणि दिलीप प्रभावळकर यांना भेटण्याची संधी
By Admin | Updated: July 19, 2014 01:21 IST2014-07-19T00:53:48+5:302014-07-19T01:21:16+5:30
औरंंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे अंताक्षरी स्पर्धा घेण्यात येत आहे.
श्रेयस तळपदे आणि दिलीप प्रभावळकर यांना भेटण्याची संधी
औरंंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे अंताक्षरी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या वेळी ‘पोस्टर बॉईज’ या आगामी चित्रपटातील स्टार कलाकार श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, नेहा जोशी, ऋषिकेश जोशी निर्माती दीप्ती तळपदे, दिग्दर्शक समीर पाठक यांना भेटण्याची भाग्याची संधी मिळणार आहे, ही स्पर्धा आज दुपारी ३ वाजता संत तुकाराम नाट्यगृह, सिडको एन-५ येथे घेण्यात येणार आहे.
या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त सखींनी घ्यावा, असे आवाहन सखी मंचने केले आहे. सखींच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सखी मंच नेहमीच कार्यरत असते.
या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सरर डायबेटिक डाएट आणि न्यूट्री हेल्थ क्लिनिक हे आहेत.