लज्जतदार पदार्थ बनविण्याची संधी
By Admin | Updated: May 29, 2014 00:37 IST2014-05-28T23:48:00+5:302014-05-29T00:37:16+5:30
बीड : स्वयंपाक घराच्या क्विन असलेल्या गृहिणींना आपण वेगळा पदार्थ बनवावा आणि तो कुटुंबाने आवडीने खावा असे नेहमीच वाटते. लहान मुलांचे खाण्याचे शौक काही वेगळेच.

लज्जतदार पदार्थ बनविण्याची संधी
बीड : स्वयंपाक घराच्या क्विन असलेल्या गृहिणींना आपण वेगळा पदार्थ बनवावा आणि तो कुटुंबाने आवडीने खावा असे नेहमीच वाटते. लहान मुलांचे खाण्याचे शौक काही वेगळेच. अशा वेळी पदार्थ बनविताना तारेवरची कसरत करणार्या गृहिणींना लज्जतदार पदार्थ बनविण्याची संधी ‘लोकमत सखीमंच ’ व कीड झी ने उपलब्ध करून दिली आहे. ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता कीड झी तर्फे ‘आम्ही खवय्ये’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध शेप हरपाल सोखी प्रात्यक्षिके दाखवून खास टिप्सही देणार आहेत. हा कार्यक्रम येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडणार आहे. स्वयंपाकघर हा गृहिणींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. दररोजच्या स्वयंपाकात नवनवीन बदल करून आपल्या कुटुंबियांच्या पोटोबाला खुष करण्याची धडपड गृहिणी सतत करीत असतात. परंतु दररोज कुठला वेगळा पदार्थ बनवावा किंवा पारंपरिक पदार्थात काय नवीन बदल करावा? हा यक्ष प्रश्न महिलांपुढे उभा राहतोच. या प्रश्नांचे उत्तर महिलांना आम्ही खवय्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. या कार्यक्रमाला येताना लोकमत सखीमंचच्या सभासदांनी ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)