वसमत येथे लज्जतदार पदार्थ शिकण्याची संधी

By Admin | Updated: June 9, 2014 01:14 IST2014-06-09T00:40:00+5:302014-06-09T01:14:08+5:30

वसमत : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ९ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.

The opportunity to learn the juicy substance at Vasatma | वसमत येथे लज्जतदार पदार्थ शिकण्याची संधी

वसमत येथे लज्जतदार पदार्थ शिकण्याची संधी

वसमत : गृहिणींसाठी ‘लोकमत सखीमंच’ तर्फे एका उत्तम कार्यशाळेचे आयोजन ९ जून रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरातील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय येथे होणार आहे.
गृहिणींचे स्वयंपाकघराशी अगदी जवळचे नाते असते. स्वयंपाकघराची क्वीन समजल्या जाणाऱ्या गृहिणींना नेहमी काही ना काही नवीन पदार्थ बनवावा आणि तो आपल्या कुटुंबियांना खाऊ घालावा, असे वाटत असते; परंतु सर्वांचे मुड जपत जे पदार्थ बनवावे लागतात त्यात मात्र गृहिणींची तारेवरची कसरत होत असते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पदार्थ शिकण्याची सुवर्णसंधी वसमत सखींना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक बचपन इंग्लिश स्कुल वसमत यांनी स्वीकारले आहे.
कार्यक्रमास येताना सखीमंच सदस्यांनी ओळखपत्र सोबत आणावे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही.
कार्यक्रमास सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: The opportunity to learn the juicy substance at Vasatma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.