‘लोकमत जागर स्त्री शक्तीचा’ मधून संवादाची मिळणार संधी
By Admin | Updated: March 13, 2015 00:43 IST2015-03-13T00:20:43+5:302015-03-13T00:43:21+5:30
बीड : ‘लोकमत सखीमंच’ने ‘लोकमत जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला असून, यामध्ये महिलांना ज्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

‘लोकमत जागर स्त्री शक्तीचा’ मधून संवादाची मिळणार संधी
बीड : ‘लोकमत सखीमंच’ने ‘लोकमत जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला असून, यामध्ये महिलांना ज्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत सखीमंचने सोमवारी येथील संस्कार विद्यालयाच्या हॉलमध्ये सायं. ४ वा. ‘लोकमत जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये महिलांची सुरक्षा, गृहोद्योग, संगणक आणि इंटरनेट प्रशिक्षण आदी विषयांवर सखी मंच सदस्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिलांना त्यांच्या अडीअडचणी या परिचर्चेच्या माध्यमातून मान्यवरांसमोर मांडता येणार आहेत. महिलांच्या या प्रश्नांवर उपस्थित तज्ज्ञांकडून मार्ग काढला जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम महिलांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. यापूर्वीही अशाप्रकारे लोकमतने विविध कार्यक्रम आयोजित केले होते, याला महिलांमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले.
सखीमंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून तज्ज्ञांशी संवाद साधून मार्गदर्शन मिळवावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)