स्वप्नातील घर मिळविण्याची संधी!
By Admin | Updated: September 26, 2014 01:56 IST2014-09-26T00:29:02+5:302014-09-26T01:56:22+5:30
औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य क्रेडाई या बांधकाम संघटनेतर्फे ‘ड्रीम होम-२०१४’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

स्वप्नातील घर मिळविण्याची संधी!
औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य क्रेडाई या बांधकाम संघटनेतर्फे ‘ड्रीम होम-२०१४’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी थाटात उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन २९ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, औरंगाबादकरांना आपल्या स्वप्नातील घर विकत घेण्याची एक सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण घर खरेदी करतात. आकाशवाणी चौक येथील मोतीवाला स्क्वेअर एकाच छताखाली विविध सुविधा असलेले प्रदर्शन क्रेडाईतर्फे भरविण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यास क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, अध्यक्ष पापालाल गोयल, नितीन बगडिया, संजय कासलीवाल, सुनील पाटील, नरेंद्र जबिंदा, देवानंद कोटगिरे, जुगलकिशोर तापडिया, प्रमोद खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन रवी वट्टमवार यांनी केले, आभार बाळकृष्ण भाकरे यांनी मानले.
प्रदर्शनात शहरातील ४७ नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी स्टॉल लावले असून, सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २५ स्टॉलवर विविध वित्तीय संस्था व बँका नागरिकांना गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहेत. तसेच काही सप्लायर्सनीही स्टॉल लावले आहेत. प्रदर्शनस्थळी २९ सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता वास्तुशास्त्राचे महत्त्व या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनासाठी ओमिक्रॉन ग्रुप-प्लॅटिनम, शमित बिल्डकॉन-गोल्ड, सिल्व्हर विकास डेव्हलपर्स, अमृत डेव्हलपर्स व एचडीएफसी बँक आणि इंडिया प्रॉपर्टी डॉट कॉम- डिजिटल पार्टनर हे प्रायोजक आहेत. प्रदर्शनात नागरिकांनी सहभागी होऊन मनपसंत वास्तूचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष पापालाल गोयल यांनी केले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी अनिल मुनोत, सचिन वोहरा, प्रकाश मालखरे, जितेंद्र मुथा, सुयोग रुणवाल, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संभाजी अतकरे, संग्राम पटारे, विजय सक्करवार, उदय कासलीवाल, सुनील बेदमुथा, सिद्धार्थ कांकरिया, प्रसाद पिंगळे आदी विशेष परिश्रम घेत आहेत.
पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घ्या...
मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बिल्डरांनी आपला प्रकल्प पूर्ण केल्यावर कम्प्लिशन (पूर्णत्वाचे प्रमाणपत्र) घेतले पाहिजे. शहर स्वच्छ, सुंदर असावे यादृष्टीनेही प्रयत्न करावेत. आयुक्तांनी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहनही केले.