‘मांजरा’च्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा

By Admin | Updated: April 7, 2015 01:23 IST2015-04-07T00:44:09+5:302015-04-07T01:23:03+5:30

लातूर : मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत.

Opponents spoil the 'Manjra' election | ‘मांजरा’च्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा

‘मांजरा’च्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा


लातूर : मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला असून, आमदार अमित देशमुख यांच्यासह विद्यमान चेअरमन धनंजय देशमुख मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.
मांजरा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली. शनिवारी मतदान झाले होते. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी झाली असून, पाचव्या फेरीअखेर विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी झाली. एकूण पाच फेऱ्या झाल्या. प्रत्येक फेरीत विलासराव देशमुख सहकार पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. पाचव्या फेरीच्या मोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विलासराव देशमुख सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या विजयाची घोषणा केली.
चिंचोलीराव वाडी ऊस उत्पादक गट क्र. १ मधून विद्यमान चेअरमन धनंजय चंद्रसेन देशमुख यांना ८ हजार २०३, रावसाहेब विठ्ठलराव मुळे यांना ८ हजार ३८ आणि पांडुरंग नरसिंग सूर्यवंशी हे ७ हजार ९८४ मते घेऊन विजयी झाले. तर विरोधी पॅनलमधील बलभीम अडसुळ १००, श्रीकृष्ण अडसुळ ३९४, राजकुमार कलमे यांना ५५९ मते मिळाली. तर बाभळगाव गट क्र. २ मधून तात्यासाहेब दादासाहेब देशमुख ८ हजार १७, प्रताप रामराव पडिले ८ हजार ४४, अतुल किसनराव पाटील ८ हजार ९६ मते घेऊन विजयी झाले. विरोधी पॅनलमधील शिवराज पवार ४७९, संभाजी पवार ४२२, विक्रम शिंदे यांना ५७६ मते मिळाली.
चिखुर्डा गट क्र. ३ मधून वसंत नामदेव उफाडे ८ हजार ६०, अरुण विश्वनाथ कापरे ८ हजार ८५, अशोक मुकुंदराव काळे ८ हजार २१० मते घेऊन पाचव्या फेरीत विजयी झाले. तर विरोधी पॅनलमधील प्रभाकर आलट ४४०, अ‍ॅड. बळवंत जाधव ६१६, शहाजीराव येलूरकर यांना ४२४ मते मिळाली.
गाधवड गट क्र. ४ मधून बंकट व्यंकटराव कदम ७ हजार ९८६, अमित विलासराव देशमुख ८ हजार ३२१ व जगदीश जगजीवनराव बावणे ८ हजार ७४ मते घेऊन विजयी झाले आहेत. तर विरोधी पॅनलमधील चंद्रकांत वांगसकर यांना ६५० मते मिळाली.
आलमला गट क्र. ५ मधून चाँदपाशा अमीरसाब अन्सारी ८ हजार ५४, श्रीशैल्य मल्लिकार्जुन उटगे ८ हजार २५९ आणि सदाशिव वसंत कदम ८ हजार ५८ मते घेऊन विजयी झाले. विरोधी पॅनलमधील शिवचरण लोहारे ६०२, चंद्रसेन साळुंके ४४२, सुरेश क्षीरसागर यांना ४३५ मते मिळाली.
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागासप्रवर्ग मतदारसंघ क्र. ६ मधून व्यंकट पंढरीनाथ कराड हे ७ हजार ७३७ मते घेऊन विजयी झाले. तर विरोधी पॅनलमधील राजेश काशिराम कराड यांना ७८९ मते मिळाली. तर इतर मागासवर्गीय जात मतदारसंघ क्र. ५ मधून श्रीहरी तुळशीराम चामले हे ८ हजार ३५ मते घेऊन विजयी झाले. तर विरोधी पॅनलमधील प्रल्हाद बाबुराव बंडापल्ले यांना ४८२ मते मिळाली. अनु. जाती मतदारसंघातून अनिल नरसिंग दरकसे ८ हजार ३० मतांनी विजयी झाले. विरोधी पॅनलमधील मुकुंद भोसले यांना ४८० मते मिळाली. (प्रतिनिधी)
मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवार राजेश कराड यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनल होते. मात्र त्यांनी उमेदवार असताना मतदान केले नाही. त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही मतदान केले नसल्याचा आरोप मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन धनंजय देशमुख, व्हाईस चेअरमन जगदीश बावणे, संचालक व्यंकट कराड यांनी केला. उमेदवार असूनही मतदान न करणे ही लोकशाहीची थट्टा आहे. भविष्यात अशा लोकांना लातूरच्या जनतेने कोणत्याही निवडणुकीत थारा देऊ नये, असेही विद्यमान चेअरमन धनंजय देशमुख म्हणाले.

Web Title: Opponents spoil the 'Manjra' election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.