शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने, उद्धवसेनेलाला कंटाळलेले करणार शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:02 IST

संजय राऊत यांनी वर्तवलेले एकही भाकीत खरे ठरलेले नाही. त्यामुळे त्यांना ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असेच बोलावे लागेल: संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने राबवणार आहे. अनेक जण आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहेत. विशेषत: उद्धवसेनेला कंटाळून अनेकजण आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिंदेसेनेचे नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

घाटी रुग्णालयातील जिमखाना इमारतीच्या नूतनीकरणाचे गुरुवारी संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी पालकमंत्री शिरसाट बोलत हाेते. ते म्हणाले, पावसाळी अधिवेशनापूर्वी नव्हे, आधीपासून आमच्याकडे प्रवेश सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रोज प्रवेश होत आहेत. मुंबई महापालिकेत ४० पेक्षा अधिक नगरसेवक, अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ऑपरेशन टायगर हे जोमाने सुरू होत आहे. या सोमवारपासून ज्यांना त्यांच्या पक्षात विचारले जात नाही, असे अनेक लोक उद्धवसेनेला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतील. आमचे टायगर एकच आहे, एकनाथ शिंदे. त्यांच्या नेतृत्वात हे प्रवेश होतील. अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत, असेही शिरसाट म्हणाले.

राऊतांचे एकही भाकित खरे ठरले नाहीसंजय राऊत यांनी वर्तवलेले एकही भाकीत खरे ठरलेले नाही. त्यामुळे त्यांना ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असेच बोलावे लागेल. मुंबईचे वाटोळे करणाऱ्यांच्या हातात मुंबई राहणार नाही. ती शिवसेना-भाजपच्या ताब्यात राहील. तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणावरून उद्धवसेनेकडून होत असलेल्या आरोपाविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, उद्धवसेनेचा काही घडण्यापूर्वी तपास झालेला असतो. यंत्रणा तपासणी करण्याआधीच ते आरोप करून मोकळे होतात. तपासात अडचणी निर्माण करतात.

ठाकरे बंधू एकत्र येणारच नाहीतउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. राज यांनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट केली. पण, ते कधी स्वीकारले गेले नाही, असा टोला शिरसाट यांनी राज यांना लगावला. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊत