जिल्ह्यात पोलिसांचे आॅपरेशन आॅलआऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:35 IST2017-08-10T23:35:55+5:302017-08-10T23:35:55+5:30
जिल्ह्यात २८ पोलीस ठाण्यांतर्गत एकाच वेळी आॅपरेशन आॅलआऊट ही मोहीम हाती घेण्यात आली.

जिल्ह्यात पोलिसांचे आॅपरेशन आॅलआऊट
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात २८ पोलीस ठाण्यांतर्गत एकाच वेळी आॅपरेशन आॅलआऊट ही मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे चौकाचौकात, रस्त्यांवर पोलिसच दिसून येत होते. नाकांबदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सर्वत्र हाती घेण्यात आली.
एकाच वेळी सर्व ठाण्यांचे पोलीस रस्त्यावर दिसू लागल्यामुळे नागरिकही बुचकळ्यात पडत आहेत. दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत ही मोहीम राबविणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.