नेत्र विभागाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना
By Admin | Updated: July 28, 2016 00:57 IST2016-07-28T00:38:48+5:302016-07-28T00:57:07+5:30
सितम सोनवणे , लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या स्वतंत्र २ कोटीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ बांधकाम विभागाकडून

नेत्र विभागाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना
सितम सोनवणे , लातूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या स्वतंत्र २ कोटीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ बांधकाम विभागाकडून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे़ महिनाभरात नव्या इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरु होणार असल्यसाची केवळ चर्चाच आहे़ परिणामी, नेत्र विभागाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना़
शहरातील जिल्हा रुग्णालयात पूर्वी जागतिक बँकेच्या सहाय्याने नेत्र अभियान राबविण्यात येत होते़ त्या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात जागतिक बँकेच्या आर्थिक निधीतून स्वत्रंत इमारत बांधण्यात आली होती़ यात नेत्र रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात होत्या़ जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि अपुरी जागा यामुळे नेत्र विभागाचे २ कोटी २१ लाख ७ हजार रूपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले़ जिल्हा नियोजन विभागाने १ कोटी ६९ लाखांचा निधी दिला़ तर राज्य शासनाने ५२ लाख ७ हजार रुपयांचा निधी दिला़ या दोन्ही निधीमुळे आता जुन्या नेत्र विभागाच्या इमारती लगतच दुसरी सुसज्ज अशी दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे़ याच परिसरात सुसज्ज असे शस्त्रक्रिया गृह बांधण्यात आले आहे़ तर दुसऱ्या मजल्यावर नेत्र विभागाचे कार्यालय, इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कक्ष बांधण्यात आले आहे़ अशा अत्याधुनिक व्यवस्थेमुळे नेत्र विभाग आधुनिक बनला आहे़ मात्र उद्घाटनाची प्रतिक्षा आहे़