मुक्त विद्यापीठाचे पुस्तके पडून

By Admin | Updated: December 17, 2015 23:58 IST2015-12-17T23:55:21+5:302015-12-17T23:58:38+5:30

परभणी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विविध अभ्यासक्रमांची पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप पोहचली नाहीत़

Open University books | मुक्त विद्यापीठाचे पुस्तके पडून

मुक्त विद्यापीठाचे पुस्तके पडून

परभणी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विविध अभ्यासक्रमांची पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप पोहचली नाहीत़ ही पुस्तके पोस्ट कार्यालय आणि बसस्थानकावर पडून असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात़ जे विद्यार्थी नियमित अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांपासून मुक्त विद्यापीठामार्फत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे़ मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामधून पुस्तके पुरविले जातात़ ही पुस्तके त्या त्या जिल्ह्यातील व तालुक्यातील अभ्यासक्रेंदावरून यापूर्वी दिली जात होती़ मात्र यावर्षी विद्यापीठाने पुस्तके वाटप करण्याच्या पद्धतीत बदल केला़ थेट विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी पोस्ट कार्यालय आणि खाजगी कुरीअर एजन्सीचा वापर पुस्तके वाटपासाठी करण्यात आला़ परंतु, पुस्तकांची संख्या आणि खाजगी एजन्सी व पोस्ट कार्यालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही पुस्तके अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाहीत़ विद्यार्थ्यांना स्वत:हून बसस्थानकावरील कुरीअर एजन्सी व पोस्ट कार्यालयात जाऊन पुस्तके प्राप्त करून घ्यावी लागत आहेत़ या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोेंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे़ परभणी शहरामध्ये मुक्त विद्यापीठाची चार केंद्र आहेत़ याशिवाय तालुक्याच्या ठिकाणीही अभ्यास केंद्र आहेत़ या केंद्रांमधून विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमाची नोंदणी केली आहे़ या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणे अपेक्षित असताना अद्याप अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत़ त्यामुळे विद्यार्थ्यांची ओरड वाढली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Open University books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.