पाशुवाडी-सह्याद्रीनगर येथील दर्ग्याजवळ खुले मंडप व सिमेंट रस्ता
By Admin | Updated: July 14, 2014 01:05 IST2014-07-14T00:48:54+5:302014-07-14T01:05:02+5:30
औरंगाबाद : एन -६ पाशुवाडी-सह्याद्रीनगर येथील दर्ग्याजवळ खुले सभामंडप व सिमेंट रस्त्याचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पाशुवाडी-सह्याद्रीनगर येथील दर्ग्याजवळ खुले मंडप व सिमेंट रस्ता
औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४९ गुलमोहर कॉलनी येथील एन -६ पाशुवाडी-सह्याद्रीनगर येथील दर्ग्याजवळ खुले सभामंडप व सिमेंट रस्त्याचे उद्घाटन औरंगाबाद पूर्वचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, तसेच वॉर्ड क्र. ४८ आविष्कार कॉलनीतील चिश्तिया कॉलनीच्या गल्लीत ड्रेनेज लाईनचे व याच वॉर्डातील सफा वॉशिंग सेंटरपासून ते खाली आबेद पठाण यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचेही उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन व त्यांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात असा ध्यास घेऊन राजेंद्र दर्डा विकासकामे करतात, अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. ते ज्या भागात जातात, तेथे नागरिकांची मोठी गर्दी आपोआपच झालेली असते. पाशूवाडी-सह्याद्रीनगरात ते आले आणि कॉलनीतील नागरिकांची अशीच गर्दी झाली. हेच दृश्य चिश्तिया कॉलनीतही बघावयास मिळाले.
विकासकामांच्या या तीनही उद्घाटनांचा मान त्यांनी त्या त्या भागातील ज्येष्ठांना देऊन त्यांचाही सन्मान केला. पाशूवाडी दर्ग्याजवळ खुले मंडप व्हावे व सिमेंट रस्ता व्हावा, अशी मागणी होती. ती पूर्ण झाल्याने नगरसेविका रेखा जैस्वाल, अब्दुल रशीद, शफिक खान, शेख इरफान, शेख शफिक, जाकीर खान, नदीम पटेल, वसीम खान, अब्दुल हाफीज, असीफ पटेल, जनार्दन अमृतकर, डॉ. अजय जैस्वाल, गीता जैस्वाल, मतीन पटेल, हसीनाबी, अरविंद मोदी, प्रशांत सोनवणे पाटील, शेखलाल, नीलेश सुरासे आदींनी समाधान व्यक्त केले. यावेळी कृ.उ.बा.चे माजी सभापती पंकज फुलपगर, राधाकृष्ण गायकवाड, बबन डिडोरे पाटील, किरण पाटील, माजी नगरसेवक अशोक वीरकर, सुधाकर मांडोळे, अॅड. सुनीता तायडे- निंबाळकर, अर्चना मुंदडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चिश्तिया कॉलनीतील दोन्ही उद्घाटनांच्या वेळी ढोल- ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे स्वागत करण्यात आले.
त्यांच्या हातात हात घेऊन अनेक नागरिकांनी झालेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. स्वत: राजेंद्र दर्डा यांनी कॉलनीत फिरून पाहणी केली. यावेळी मतीन अहमद, माजी नगरसेवक इब्राहीमभय्या पटेल, अनिल जैन, हाजी शहानूर पटेल गुरुजी, शेख जहीर, शहानूर पटेल, नासीर पटेल, महमद हनीफ, अब्दुल हक, मोहंमद पठाण, मकबूल पटेल, डॉ. मोबीन, एम.ए. हक, आबेद पठाण व शेकडो नागरिक स्त्री- पुरुष उपस्थित होते. विकासकामांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.