घाटीत ओपीडीच्या

By | Published: December 3, 2020 04:11 AM2020-12-03T04:11:41+5:302020-12-03T04:11:41+5:30

औरंगाबाद : घाटी रुग्णलयात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत आहे. नावनोंदणीसाठी रुग्ण रांगेत उभे राहतात. परंतु, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे ...

Of OPD in the valley | घाटीत ओपीडीच्या

घाटीत ओपीडीच्या

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णलयात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत आहे. नावनोंदणीसाठी रुग्ण रांगेत उभे राहतात. परंतु, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन होईल, यादृष्टीने कोणतेही नियोजन केलेले नाही. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वाहनांना लागलेले जॅमर निघेना

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात कारवाई करून उभे केलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात आले आहे. या वाहनांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. मात्र, वाहनधारक येत नसल्याने त्याचे जॅमर निघत नसल्याची परिस्थिती आहे.

रेल्वेस्टेशन रस्त्यावर

जनावरांचा अडथळा

औरंगाबाद : बाबा पेट्रोलपंप ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ही जनावरे अचानक समोर आल्याने भरधाव वाहन थांबवावे लागते. त्यातून अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

उस्मानपुरा रस्त्यावर धुळीचे लोट

औरंगाबाद : उस्मानपुऱ्यात संत एकनाथ रंगमंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे ही धूळ उडत आहे. त्याचा परिसरातील रहिवासी, व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बाहेरून औषधी

आणणे सुरूच

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगण्याचा प्रकार सुरूच आहे. औषधी संपल्याचे कारण पुढे करून रुग्णांना औषधी चिठ्ठी दिली जाते. औषधाची चिठ्ठी घेऊन रुग्णांचे नातेवाईक औषधी दुकानांवर जाताना दिसतात.

Web Title: Of OPD in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.