कोरोनामुक्त ‘सिव्हिल’मध्ये ९ महिन्यांनंतर ओपीडी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:16+5:302021-01-13T04:09:16+5:30
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाने औषधोपचाराने शेकडो रुग्णांना कोरोनामुक्त केले. आता ९ महिन्यांनंतर येथे एकही कोरोना रुग्ण भरती नाही. ...

कोरोनामुक्त ‘सिव्हिल’मध्ये ९ महिन्यांनंतर ओपीडी सेवा
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाने औषधोपचाराने शेकडो रुग्णांना कोरोनामुक्त केले. आता ९ महिन्यांनंतर येथे एकही कोरोना रुग्ण भरती नाही. त्यामुळे अखेर मंगळवारपासून पुन्हा एकदा बाह्यरुग्ण विभाग सुरु झाला. पहिल्या दिवशी २४ रुग्णांवर ओपीडीत उपचार करण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या हस्ते फित कापून ओपीडी सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हा रुग्णालयात २५ जून २०१८ रोजी ओपीडी सेवेला सुरुवात झाली होती. त्यानंतर आंतररुग्ण विभागही सुरु झाला. जिल्हा रुग्णालयामुळे घाटी रुग्णालयावरील रुग्णसेवेचा काही प्रमाणात भार कमी होण्यास मदत झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्च २०१९ पासून जिल्हा रुग्णालयातील सर्व उपचार बंद करून केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु याठिकाणी आता एकही रुग्ण नाही. त्यामुळे ओपीडी सेवा सुरू करण्यात आली. रुग्णालयात सर्वसाधारण आजारांवर पुन्हा एकदा उपचार सुरु झाले.
फोटो ओळ...
जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या हस्ते फित कापून ओपीडी सेवेचे उद्घाटन करण्यात आले.