अंधारीत आरटीपीसीआर चाचणी कॅम्पमध्ये केवळ दोघांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:04 IST2021-03-10T04:04:47+5:302021-03-10T04:04:47+5:30
कोरोनाला ग्रामीण भागातील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे कोरोनाची चाचणी करण्यासही नागरिक घाबरत आहेत. विनाकारण ...

अंधारीत आरटीपीसीआर चाचणी कॅम्पमध्ये केवळ दोघांची चाचणी
कोरोनाला ग्रामीण भागातील नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे कोरोनाची चाचणी करण्यासही नागरिक घाबरत आहेत. विनाकारण जर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास पुन्हा झंजट नको, म्हणून चाचणी कॅम्पकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पं. स.चे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तायडे व उपसरपंच राजू वानखेडे, डॉ. योगेश राजपूत, आरोग्य कर्मचारी नितीन गिरी, एस. एम. शेख, किरण डेहानकर, वर्षा जाधव आदींची उपस्थिती होती. मात्र, या कॅम्पमध्ये तपासणीसाठी दिवसभरात केवळ दोनच नागरिक आले होते.
फोटो :
अंधारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची चाचणी करताना डॉ. योगेश राजपूत व मान्यवर.
090321\img-20210308-wa0105_1.jpg
अंधारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची चाचणी करताना डॉ. योगेश राजपूत व मान्यवर.