स्वच्छतेच्या फक्त तोंडी सूचना
By Admin | Updated: February 3, 2015 00:59 IST2015-02-03T00:22:04+5:302015-02-03T00:59:29+5:30
बीड : जिल्ह्यातील सर्वच बस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचा त्रास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छतेसंदर्भात वरीष्ठांकडे तक्रारी केल्या

स्वच्छतेच्या फक्त तोंडी सूचना
बीड : जिल्ह्यातील सर्वच बस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचा त्रास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छतेसंदर्भात वरीष्ठांकडे तक्रारी केल्या तर केवळ सुचना देण्याचे काम ते करतात, प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा विभागीय कार्यालयात अनुभवयास मिळाला.
कर्तव्यावरून आल्यानंतर चालक, वाहक यांना आराम करता यावा, या उद्देशाने स्थानकात विश्रांतीगृह बांधण्यात आले. मात्र येथे राहणे म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विश्रांतीगृहातील समस्यांबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे दुर्गंधीचा सामना करीत खुराड्यात रहावे लागते, यावर प्रकाश टाकला होता. याची दखल घेत प्रभारी विभागीय नियंत्रक आर.एन. बनसोडे यांनी स्थानकप्रमुखाला स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. बनसोडे यांच्यासाठी या सूचना जरी नव्या असल्या तरी स्थानकप्रमुखांसाठी ही सवय होऊन गेली आहेत. (प्रतिनिधी)
विभागीय कार्यालयाकडून स्वच्छता करावी, यासंदर्भात नोटीस पाठविली जाते, मात्र या नोटीसला केराची टोपली दाखविण्याचे काम स्थानकप्रमुख करतात. असे असताना देखील वरीष्ठ अधिकारी मुग गिळून गप्पच असतात.
वरीष्ठ अधिकारी केवळ नोटीस देवून संबंधीत अधिकाऱ्यांची बोळवण करतात, प्रत्यक्षात काम झाले की नाही, हे पाहण्यासाठी मात्र त्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
४वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच इतर कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप केला जात आहे.
४कामगार संघटना डझनभर असून सुध्दा कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आवाज उठविण्यासाठी तयार नाही.