३३ गावांसाठी एकच डॉक्टर !
By Admin | Updated: July 30, 2014 01:03 IST2014-07-30T00:04:22+5:302014-07-30T01:03:11+5:30
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांतील जनतेसाठी केवळ एकच डॉक्टर असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

३३ गावांसाठी एकच डॉक्टर !
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांतील जनतेसाठी केवळ एकच डॉक्टर असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
नर्सी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावच्या ५२ हजार लोकांच्या आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी नर्सी आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती होती. त्यापैकी डॉ. एस. पी. परदेशी यांची हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात २० जुलैला बदली झाली आहे. त्याच्या जागेवर नवीन डॉक्टरांची अद्याप नियुक्ती झालेली नाही.
एकाच डॉक्टरवर लोकांचे आरोग्य अवलंबून राहिलेले आहे. नवीन डॉक्टरांची त्वरित नियुक्ती होणे गरजेचे आहे. ३३ गावांत कुठे आरोग्याचा साथरोगाची लागण झाल्यास अत्यंत बिकट परिस्थिती होईल.
महिला डॉक्टरांचीही आवश्यकता
३३ गावांमधून २४७१० महिलांच्या देखभालीसाठी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. बाळंतपण इतर समस्या जाणून घेण्यासाठी महिला डॉक्टरचीही गरज भासत आहे. दोन्ही बाबतचा विचार त्वरित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
निवासाचा प्रश्न सुटला
५ वर्षांपासून येथील डॉक्टरांना निवासस्थान नसल्याने अनेक समस्या उपस्थित होत्या; परंतु त्यांना राहण्यासाठी सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही इमारत अद्याप ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली नाही.
याविषयी अधिक माहिती संबंधित यंत्रणेकडून घेतली असता या इमारतीचे काही कामे शिल्लक राहिलेली आहेत. हे काम त्वरित पूर्ण करून डॉक्टरांच्या राहण्याच्या उपयोगी पडावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. (वार्ताहर)