शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल नऊ लाख फायलींना वाळवी

By admin | Updated: December 21, 2015 00:01 IST

औरंगाबाद : नगर परिषद आणि महापालिकेचे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार केली आहे. या रेकॉर्ड रूममध्ये मागील पन्नास वर्षांपासून अधिक काळाचे दस्तऐवज आहेत.

औरंगाबाद : नगर परिषद आणि महापालिकेचे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार केली आहे. या रेकॉर्ड रूममध्ये मागील पन्नास वर्षांपासून अधिक काळाचे दस्तऐवज आहेत. या फायलींना हळूहळू वाळवी लागण्यास सुरुवात झाली आहे. आजही मनपाला काही जुने रेकॉर्ड तपासायचे असल्यास रेकॉर्ड रूममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाण मांडून बसावे लागते. हे रेकॉर्ड नष्ट होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत, हे विशेष. नगर परिषदेच्या काळात हिमायतबाग येथील १० एकर जागा वन विभागाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या जागेचा भाडेपट्टा २०११ मध्ये संपला. मात्र, मनपाने संबंधित जागा ताब्यात घेतली नव्हती. २०१५ मध्ये नगरसेवकांनी ओरड केल्यावर मनपाने जुने रेकॉर्ड शोधून जागा ताब्यात घेतली. मनपाच्या दैनंदिन कामकाजात आजही अनेक महत्त्वाच्या फायलींची चाळणी करावी लागते. सर्वसामान्य नागरिकांनाही जुने रेकॉर्ड येथेच मिळते. दररोज पन्नासपेक्षा अधिक नागरिकांना जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड मिळविण्यासाठी यावे लागते. रेकॉर्ड रूममधील अनेक महत्त्वाच्या फाईल मागील काही वर्षांमध्ये गायब झाल्याचेही बोलल्या जाते. आजही ९ लाखांहून अधिक फायली उपलब्ध आहेत. एवढे मोठे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी मनपाने स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. दर महिन्याला रेकॉर्डवर औषध फवारणी करावी लागते. औषध फवारणी न केल्यास वाळवी संपूर्ण कागदांची चाळणी करते. औषध फवारणीमुळे कर्मचाऱ्यांना या रेकॉर्ड रूममध्ये बसणे असाह्य होते.