शिक्षकांच्या फक्त आपसी बदल्या होणार
By Admin | Updated: May 21, 2015 00:28 IST2015-05-21T00:14:23+5:302015-05-21T00:28:04+5:30
जालना : संच मान्यतेचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत प्रशासकीय व विनंतीच्या बदल्यांना राज्य शासनाने स्थगिती दिली आहे

शिक्षकांच्या फक्त आपसी बदल्या होणार
जालना : संच मान्यतेचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत प्रशासकीय व विनंतीच्या बदल्यांना राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र शिक्षकांच्या आपसी बदल्या होणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेतील अन्य विभागांच्या बदली प्रक्रियेस समुपदेशनाद्वारे बुधवारी प्रारंभ झाला.
आज पहिल्या दिवशी महिला बालकल्याण, पशुसंवर्धन व सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख आदी उपस्थित होते.
स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्क्रीनद्वारे बदलीसाठी रिक्त ठिकाण बदलीपात्र कर्मचाऱ्यांना दाखवून त्यांची संमती घेण्यात येत होती. यावेळी विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)