शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

२५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येणार; भाजपच्या अजेंड्यावर मिशन महापालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:34 IST

शहरातील एकूण १ हजार २२७ बूथ वर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : आगामी महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजपच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळे मिशन मोडवर पक्षाने सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले असून, पालिकेत एकहाती सत्ता आणण्यासाठी रविवारी दिवसभर शहरातील विविध वॉर्डांमध्ये नोंदणी मोहीम कार्यक्रम घेण्यात आले. २५० सदस्य केले तरच पदाधिकारी होता येईल, असे लक्ष्य कार्यकर्त्यांना देण्यात आले असून, त्यातून शत-प्रतिशत भाजप हा नारा देण्यात आला.

शहरातील सर्व मंडळांतील प्रमुख चौकात ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली. संघटनात्मक बांधणीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासह फुलंब्री विधानसभेतील दहा वाॅर्डात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. हर घर भाजपा या संकल्पनेतून शत-प्रतिशत भाजपाकडे वाटचाल करीत असल्याचे मत भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

सरचिटणीस संजय केणेकर, बसवराज अप्पा मंगरुळे, रामेश्वर भादवे, बापू घडामोडे, शहर सरचिटणीस लक्ष्मीकांत थेटे, अनिल मकरिये, महेश माळवतकर, जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे, अमित देशपांडे, राजेश मेहता, प्रशांत नांदेडकर, दामोधर शिंदे, मुकुंद दामोदरे, बालाजी मुंढे, ताराचंद गायकवाड, शंकर म्हात्रे, विवेक राठोड, नितीन चित्ते, लक्ष्मण शिंदे, अरुण गुदगे, नंदू गवळी, अक्षय बसैय्ये, भाऊसाहेब ताठे, बंटी चावरिया, माधुरी अदवंत, अमृता पालोदरकर, गीता आचार्य, साधना सुरडकर, शालिनी बुंधे, रूपाली वाहुळे, लता दलाल, उज्ज्वला दहीफळे, मीना मीसाळ, रेखा जैस्वाल, आदी उपस्थिती होती.

१ हजार २२७ बूथवर नोंदणी...यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे म्हणाले, शहर सदस्य नोंदणीत मराठवाडा सर्वांत पुढे आहे. परंतु, आता राज्यात प्रथम क्रमांकावर सदस्य नोंदणी करायची आहे. प्रत्येक व्यक्तीस २५० सदस्य करणे आवश्यक आहे, तरच तो पदाधिकारी होऊ शकेल. प्रत्येकाने किमान २५० सदस्य करावेत असे, आदेश प्रदेश कार्यालयाने दिले आहेत. खा. डॉ. भागवत कराड म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून २५० सदस्य नोंदणी होणे अपेक्षित आहे. वरिष्ठ पातळीवरून तसे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील एकूण १ हजार २२७ बूथ वर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका