रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा..!

By Admin | Updated: May 12, 2016 00:32 IST2016-05-12T00:12:47+5:302016-05-12T00:32:07+5:30

जालना : रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना

Only God's service ..! | रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा..!

रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा..!


जालना : रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कितीही अडचणी, समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रूग्णांची सेवा, त्यांची सुश्रूषा करणे हेच आमचे अद्य कर्तव्य असल्याची भावना परिचारिका दिनानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केली.
अद्य परिचारिका तसेच रूग्णसेवा कशी करावी यासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती म्हणून १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला सामान्य रूग्णालयातील अवरित सेवा करणाऱ्या काही परिचारिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा रूग्णालयात १०२ परिचारिका विविध विभागात कार्यरत आहेत.
अनेकदा रूग्ण नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. वरिष्ठांच्या सूचना अशा स्थितीत रूग्णसेवा विस्कळीत न होऊ देता त्यांना दर्जेदार व वेळेत सेवा देण्याचे कर्तव्य नेहमीच पार पाडत असल्याचे चित्र रूग्णालयात दिसून येते. शहर असो अथवा ग्रामीण भागात रूग्णसेवेसाठी परिचारिका तत्पर असतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. नाईटिंगेल यांनीही रूग्णसेवेला प्रथम प्राधान्य देत सेवा कशी असावी याचा घालून दिलेला परिपाठ काहीअंशी तरी आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिचारिकांनी सांगितले.

Web Title: Only God's service ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.