अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी केवळ ६० जणांवरच

By Admin | Updated: October 31, 2014 00:35 IST2014-10-31T00:09:26+5:302014-10-31T00:35:56+5:30

नितीन कांबळे , आष्टी तालुक्यात चिकुन गुन्या व डेग्यु ने दोघांचा बळी घेतला आहे. सध्या तालुक्यातील अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची धुरा केवळ ६० आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवकांवर

Only 60 people are responsible for the health of 2.5 lakh people | अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी केवळ ६० जणांवरच

अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी केवळ ६० जणांवरच


नितीन कांबळे , आष्टी
तालुक्यात चिकुन गुन्या व डेग्यु ने दोघांचा बळी घेतला आहे. सध्या तालुक्यातील अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची धुरा केवळ ६० आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवकांवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील सु. देवळा येथे डेग्युमुळे दोघांचा बळी गेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून आरोग्य सेवेची मागणी केल्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मनुष्यबळाचा आभाव असल्याचे कारण पुढे केले जात आहे. आज मिथिस किन्ही, सुदेवळा, जळगांव, डोईठाणा, भाळवणी, कऱ्हेवाडी, मातोळी, सालेवडगाव, सावरगाव, घाटा पिंप्री आदी ठिकाणी साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाहीत. याचा फटका सर्वसामान्य रूग्णांना बसत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत आष्टी तालुक्यात साथीच्या आजारांचे फैलाव जास्त असल्याने या तालुक्यात ठोस उपास योजना तात्काळ करणे आवश्यक आहे. या शिवाय आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. तेव्हाच आरोग्य विभागा साथीच्या आजारांना रोखू शकेल. असे तालुक्यातील ग्रामस्थांनी सांगितले.
तालुक्यात एकूण ३८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यासाठी १३० आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु सद्यस्थितीत केवळ ६० अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच आष्टी तालुक्यातील आरोग्य सेवेचा गाडा चालत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी यापुर्वी तालुक्यातील नागरिकांनी यापुर्वी केलेल्या आहेत. याशिवाय ज्या प्रा. आ. केंद्रावर वैद्यकीय अधिकारी आहेत. ते मुख्यालयी मुक्कामाला थांबत नाहीत. यामुळे तालुक्यात आरोग्याचे तिनतेरा वाजले आहेत.

Web Title: Only 60 people are responsible for the health of 2.5 lakh people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.