शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जायकवाडी धरणात केवळ २६ टक्के पाणी, दमदार पावसाची प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Updated: July 10, 2023 12:33 IST

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याने मराठवाड्यातील जनता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. त्यात जायकवाडीच्या उर्ध्व भागात पाऊस न पडल्याने चिंता

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जायकवाडीच्या उर्ध्व भागात जोरदार पाऊस न पडल्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक थांबलेली आहे. दुसरीकडे मात्र पाण्याचा वापर सुरूच असल्याने ९ जुलै रोजी जायकवाडी धरणात केवळ २६.८६ टक्केच जलसाठा उरला आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याने मराठवाड्यातील जनता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत जून महिना गेला. आता जुलैचे ९ दिवस उलटले तरी गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडलेला नाही. पावसाने दांडी मारल्याने मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आकाशात ढग दाटून येत आहेत. मात्र, मुसळधार पाऊस पडत नाही. परिणामी, मराठवाड्यातील नदी, नाले अजूनही कोरडे पडलेले आहेत. पैठण येथील जायकवाडी धरणाचा साठा दिवसेंदिवस घटत आहे. ९ जुलै रोजी जायकवाडी धरणात २६.८६ टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून प्राप्त झाली. याशिवाय अन्य मोठी, मध्यम आणि लघु धरणे तळ गाठत आहेत. जायकवाडीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच विविध शहरांची तहान भागविली जाते.

जायकवाडी धरणाची आजची स्थितीधरणाची पाणी साठवण क्षमता- २१७१ द.ल.घ.मी.आजचा जिवंत जलसाठा- ५८३.१३८ द.ल.घ.मी.आजच्या साठ्याची टक्केवारी- २६.८६ टक्केगतवर्षी आजच्या दिवशी असलेला जलसाठा- ७४७ द.ल.घ.मी.गतवर्षीची टक्केवारी - ३४.४५ टक्केजिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीक्षेत्र- ७ लाख ७५ हजार हेक्टर.आजपर्यंत झालेली पेरणी- ३ लाख १६ हजार हेक्टरजिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस १६९ मि.मी.प्रत्यक्षात झालेला पाऊस -१३६ मि.मी.गतवर्षी आजच्या तारखेस झालेला पाऊस-२०१ मि.मी.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी