केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:52 IST2017-08-06T23:52:09+5:302017-08-06T23:52:09+5:30

: नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 Only 25 thousand assets rise! | केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ !

केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ !

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणीसाठी दर चार वर्षांनी केल्या जाणाºया वार्षिक फेर मूल्यांकनाचे काम शहरात २००७-०८ पासून झालेले नाही. पालिकेकडे सध्या नोंदणीकृत असलेल्या ४५ हजार मालमत्तांवर कर आकारला जातो. गत दहा वर्षात शहराच्या हद्द व बांधकामांचे प्रमाण वाढले तरी पालिकेकडील मालमत्तांचा आकडा ४५ हजारांवरच अडकला आहे. त्यामुळे नगपालिकने मालमत्तांच्या फेरमूल्यांकनाचे काम सध्या नागपूर येथील एका एजन्सीला दिले आहे.
सर्वेक्षणासाठी जीआयएस मॅपींगच्या आधारे शहराचे वेगवेगळे झोन तयार करण्यात आले आहेत. एजन्सीच्या २६ कर्मचाºयांमार्फत शहरातील प्रत्येक झोनमधील मालमत्तांच्या प्रत्यक्ष मोजणीचे काम सुरू आहे. यामध्ये मालमत्तेच्या कॉरपेट व बिल्डिअ‍ॅप एरियाचे मोजमाप केले जात असून, छायाचित्रही घेतले जात आहे. शहरातील खुल्या जागांचे मोजपाही केले जात आहे. एका मालमत्तेच्या सर्वेक्षणासाठी एजन्सीला ४८५ रुपये देण्यात येणार आहेत. आतापर्यंत पालिकेने एजन्सीला ४० लाख रुपये दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर एजन्सीने दीड वर्षात २५ हजार मालमत्तांचे मूल्यांकन केले असून, संगणकीय नोंद घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, गत काही वर्षात शहरात अनेक नवीन बांधकाम झाली आहेत.
तसेच जुन्या बांधकामांमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दहा वर्षानंतर होणाºया सर्वेक्षणात केवळ २५ हजार मालमत्ता आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांच्या प्रारुप याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. याद्या तयार झाल्यानंतर नगररचना विभागाची परवानगी घेऊन त्यांच्यावर कर आकारला जाईल. जुन्या व नवीन मालमत्तांची संख्या सध्या ७० हजारांपर्यत आहे. यामध्ये काही प्रमाणात वाढ होईल, असे नवीन कर आकारणी विभागाचे नेल्सन कांबळे यांनी सांगितले.

Web Title:  Only 25 thousand assets rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.