शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २१ प्रकल्प ‘फुल्ल’

By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST

उस्मानाबाद : यंदा वरूणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने सद्यस्थितीत केवळ २१ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ तर १० प्रकल्पातील पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या वर गेली आहे़

उस्मानाबाद : यंदा वरूणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने सद्यस्थितीत केवळ २१ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ तर १० प्रकल्पातील पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या वर गेली आहे़ २४ प्रकल्प कोरडेठाक असून, ६३ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे़ गणेशोत्सव कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हा टँकरमुक्त झाला आहे़ दरम्यान, असे असले तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. यामुळे उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. सलग तीन वर्षाचा दुष्काळ आणि गतवर्षी अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील टँकरच्या संख्येने शंभरी गाठली होती़ तर ३०० पेक्षा अधिक विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या़ तर चालू वर्षी पावसानेही अडीच महिने उशिराने जिल्ह्यात हजेरी लावली़ त्यामुळे जुलै महिन्यात टँकरची संख्या शंभरावर तर अधिग्रहण तीनशेवर गेले होते. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाऊस झाल्याने टँकर व अधिग्रहणांची संख्या कमी झाली होती. सप्टेंबर महिन्यात चालु असलेले पाणी टँकर व अधिग्रहण पाणी टंचाई नसल्याने प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघु व साठवण तलाव आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघू प्रकल्प आहेत़ यातील एक मध्यम आणि २० लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ एका मोठ्या व ९ लहान प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर आहे़ १६ प्रकल्पातील पाणीपातळी ५१ टक्के ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान आहे़ यात दोन मध्यम आणि १४ प्रकल्पांचा समावेश आहे़ तर २३ प्रकल्पातील पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा कमी असून, यात दोन मध्यम आणि ४७ लघू प्रकल्पांचा समावेश आहे़ तर तब्बल ६३ प्रकल्पाची पाणीपातळी अद्यापही जोत्याखाली असून, एक मध्यम व २३ लघू असे २४ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ (प्रतिनिधी)