पाण्याच्या ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा
By Admin | Updated: October 29, 2016 00:52 IST2016-10-29T00:24:41+5:302016-10-29T00:52:33+5:30
औरंगाबाद : हडको भागातील नागरिकांना ठरवून दिल्यानुसार ४५ मिनिटे पाणी कधीच मिळत नाही व पाणी आल्यास ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा असते.

पाण्याच्या ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा
औरंगाबाद : हडको भागातील नागरिकांना ठरवून दिल्यानुसार ४५ मिनिटे पाणी कधीच मिळत नाही व पाणी आल्यास ४५ मिनिटांपैकी १५ मिनिटे नुसतीच हवा असते. ही गंभीर बाब असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या औरंगाबाद मध्यच्या संघटक संगीता कृष्णा बोरसे व उपविभाग संघटक वंदना रमेश इधाटे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. त्यात त्या म्हणतात, हडको भागातील महिलांची एक बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यात मनपातर्फे ठरवून दिलेल्या वेळेत नळाला पाणी येत नाही व १५ मिनिटे तर नुसती हवा असते.
काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी येणार नाही ंिकंवा केव्हा येणार हा मेसेजही मनपा कार्यालयाकडून मिळत नाही, मनपाने जनता दरबारमध्ये जनतेच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात, असा आग्रहही बोरसे- इधाटे यांनी धरला आहे. .
गजानननगर येथील सरला कासलीवाल, छाया पैठणपगारे व बी. एस. म्हस्के यांच्या घरासमोरील विद्युत तारेवरच्या फांद्या तोडण्यात याव्यात अन्यथा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते, याकडेही मनपा उद्यान अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे मनपा उद्यानात रोजच काही विशिष्ट मंडळी माती नेणे, दूर्वा तोडत बसणे, झाडांची पाने, फुले, फांद्या तोडणे हे प्रकार करीत आहेत. काही शेजाऱ्यांनी आपल्या भिंतीलगतची झाडे तोडून टाकण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.