शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भरणार ऑनलाईन शाळा, शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 15:16 IST

Aurangabad Municipal Corporation : ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची ( corona Virus in Aurangabad ) वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा प्रभाव या पार्श्वभूमीवर शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा उद्यापासून ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने ( Aurangabad Municipal Corporation ) घेतला आहे. या काळात शाळा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहेत. 

शहरात रोज नव्या भागात रुग्णांचे निदान होत आहे. शिवाय ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरात काही दिवसांपूर्वी दोन ओमायक्रॉन बाधीत आढळून आले होते. ते उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढत आहे. मंगळवारी तर तब्बल १०३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शहराचा पॉझीटीव्हीटी रेट सुद्धा वाढत जात आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपया म्हणून शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उद्या गुरुवार ( दि. ६ जानेवारी ) पासून अंमलात येणार आहे. शाळा बंद झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन अध्ययन सुरु करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. 

नववी ते बारावी सुरु राहणार या काळात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये सुरु राहणार आहेत. तसेच दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील.  

असा वाढला पाॅझिटिव्हिटी रेटशहरात २७ डिसेंबर पाॅझिटिव्हिटी रेट ०.१६ टक्के होता. या दिवशी शहरात ४ रुग्णांची वाढ झाली होती. आठ दिवसांत शहरातील नव्या रुग्णांची संख्या ४ वरून सोमवारी २९ वर गेली. पाॅझिटिव्हिटी रेट १.२१ टक्के राहिला.

अशी वाढतेय रुग्णसंख्यातारीख - ग्रामीण-शहर२७ डिसेंबर - ०-४२८ डिसेंबर - ०-९२९ डिसेंबर - १-१५३० डिसेंबर - २-१४३१ डिसेंबर - ४-१४१ जानेवारी - १०-१६२ जानेवारी- ७-२८३ जानेवारी-८-२९४ जानेवारी - ८७- १६

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका