भाडेकरारही आॅनलाईन
By Admin | Updated: January 2, 2016 23:55 IST2016-01-02T23:42:50+5:302016-01-02T23:55:35+5:30
औरंगाबाद : घर, फ्लॅट, जमिनीसाठी दोन नागरिक, संस्थांचा आपापसातील नोंदणीकृत भाडेकरार करण्याची सुविधा आता लवकरच आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भाडेकरारही आॅनलाईन
औरंगाबाद : घर, फ्लॅट, जमिनीसाठी दोन नागरिक, संस्थांचा आपापसातील नोंदणीकृत भाडेकरार करण्याची सुविधा आता लवकरच आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची तयारी मुद्रांक शुल्क विभागाने सुरू केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शहराच्या विविध भागांत यासाठी खाजगी तत्त्वावर केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी उपनिबंधक जी. एस. कोळेकर यांनी दिली.
भाड्याने दिलेले घर, फ्लॅट बळकावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सुरक्षिततेसाठी शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाडेकरार करण्यात येतात. सध्या लहान मोठा भाडेकरार करण्यासाठी १०० रुपयांचा बॉण्ड करण्यात येऊन या कराराचा कागद दोन्ही व्यक्तींकडे ठेवण्यात येतो.
ही सुविधा आॅनलाईन उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना लहान मोठ्या करारासाठी रजिस्ट्री कार्यालयाची पायरी चढावी लागणार नाही. आॅनलाईन भाडेकरारासाठी शहरात विविध ठिकाणी खाजगी तत्त्वावर विविध संस्थांना केंद्रचालविण्यास देण्यात येणार असून, नागरिकांना या कें द्रावरून नोंदणी करता येईल. कराराची संपूर्ण कागदपत्रे रजिस्ट्री कार्यालयाकडे आॅनलाईन येतील. भाडेकरारासाठीची कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर व्यवहार योग्य असल्यास नोंदणी केलेल्या अधिकृत कराराची प्रत देण्यात येईल. करार कसा करायचा तसेच यातील अटी ठरविण्याचा अधिकार हा लिहून घेणारा व लिहून देणारा अशा दोघांचा राहणार आहे.