मका खरेदीची ऑनलाइन नोंदणी बंद, शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:40+5:302020-12-30T04:06:40+5:30
शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांची मका १८५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचे जाहीर केले. शासनाकडून ऑनलाइन नोंदणीसाठी वेबसाइड ...

मका खरेदीची ऑनलाइन नोंदणी बंद, शेतकरी अडचणीत
शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांची मका १८५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचे जाहीर केले. शासनाकडून ऑनलाइन नोंदणीसाठी वेबसाइड विकसित केली; परंतु उद्घाटन करून त्याचा काहीही उपयोग शेतकऱ्यांना झाला नाही. ऑनलाइनची वेबसाइटच बंद पडत असल्याने शेतकऱ्यांनी मका कोठे विक्री करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे; परंतु खरेदी- विक्री केंद्रावरील या अडचणींमुळे मक्याची विक्री थांबली आहे. त्यामुळे नाइलास्तव शेतकऱ्यांना बाराशे ते तेराशे रुपयांत खासगी व्यापाऱ्यांकडे मका विक्री करावी लागत आहे.
चेअरमन म्हणतात महसूल प्रशासनाला विचारा
खासगी व्यापारी आणि शासकीय खरेदी केंद्राचे साटेलोटे असल्यामुळेच हा प्रकार घडू लागला आहे, असा आरोप शेतकरी रघुनाथ मोरे, कारभारी मोरे, पोपट देवमण मोरे, सूर्यभान मोरे, नामदेव मालोदे या शेतकऱ्यांनी केला. याविषयी बाजार समितीचे चेअरमन अर्जुन गाडे यांना विचारणा केली असता, वेबसाइटची माहिती तहसील प्रशासनाकडे जाऊन विचारा. त्यामुळे प्रशासनाने बाजार समिती प्रशासनाने हात वर करून आपली जबाबदारी झटकली आहे. शेतकऱ्यांनी आता करायचे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.