निवडणुकीची माहिती मिळणार आॅनलाईन

By Admin | Updated: September 13, 2014 00:11 IST2014-09-12T23:55:37+5:302014-09-13T00:11:18+5:30

परभणी : विधानसभा निवडणुकीची इत्यंभूत माहिती मतदारांना एका क्लिकवर मिळण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

Online information will be available online | निवडणुकीची माहिती मिळणार आॅनलाईन

निवडणुकीची माहिती मिळणार आॅनलाईन

परभणी : विधानसभा निवडणुकीची इत्यंभूत माहिती मतदारांना एका क्लिकवर मिळण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण माहिती वेबसाईटच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविली होती. नागरिकांना सर्वात जास्त उत्सूकता असते ती निकालाची. त्यामुळे निकालाचे देखील प्रती मिनिटाचे अपडेट या वेबसाईटवर टाकण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही निकालाची माहिती लगेच मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीचीही माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ६६६.स्रं१ुँंल्ल्री’ीू३्रङ्मल्ल२.ूङ्मे ही वेबसाईट कार्यान्वित केली आहे. या वेबसाईटवर माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.
निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची माहिती, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची माहिती, निवडणुकीसाठी कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती, मतदार नियंत्रण कक्ष, मतदारसंघ निहाय एकूण मतदार, वाहतुकीचे नियोजन, मतदान केंद्र, खर्चाचे दरपत्रक, फिडबॅक याची सर्व माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभेसाठी कार्यरत असलेले निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकही देण्यात आले आहेत. तसेच शासनाचा स्वीप कार्यक्रम, मतदान दिवसाची माहिती, मतमोजणी दिवसाची माहिती येथे लवकरच मिळणार आहे.
या वेबसाईटमुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातील प्रशासकीय माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Online information will be available online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.