शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

लॉकडाऊन काळात १६० जणांची ३२ लाख ६० हजारांची ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:16 IST

आॅनलाईन कर्ज मिळवून देतो, पेट्रोलपंपाची एजन्सी देतो, नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या यात सर्वाधिक तक्रारी अधिक आहेत.

ठळक मुद्देसायबर सेलने ६ लाख ८५ हजार ७०० रुपये दिले परत मिळवूननोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या सर्वाधिक तक्रारी

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन शिथिल होताच जून महिन्यात  सायबर पोलीस ठाण्यात आॅनलाईन फसवणुकीच्या तब्बल १६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३२ लाख ६० हजार १०८ रुपये हडप केल्याचे समोर आले.

आॅनलाईन कर्ज मिळवून देतो, पेट्रोलपंपाची एजन्सी देतो, नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या यात सर्वाधिक तक्रारी अधिक आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.  व्यवसाय ठप्प झाले आहेत, अशा परिस्थितीत लोक कर्ज घेऊन संकटकाळावर मात  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. हे गुन्हेगार  इंटरनेटवर आॅनलाईन झटपट कर्ज मिळेल अशा लिंक टाकतात. काही भामटे मोबाईलवर मेसेज पाठवून तुम्हाला मोठ्या रकमेचे  कर्ज मंजूर झाल्याचे कळवितात. त्यात त्यांचा मोबाईल नंबर असतो. त्यांच्या  मोबाईल नंबरवर अथवा लिंकशी संपर्क साधल्यानंतर फसवणुकीला सुरुवात होते.

गुन्हेगार अल्प व्याजदराने आणि अवघ्या काही दिवसांत कर्ज देण्याचे आमिष दाखवितात. कर्जाची फाईल तयार करणे, कागदपत्रांची पडताळणी करण्याची  कारणे सांगून त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून फसवणूक करतात. कर्ज मिळेल या आशेने सामान्य माणूस त्यांना पैसे देतो. मात्र, अनेक दिवस प्रतीक्षा करूनही ते कर्ज देत नाहीत आणि आरोपींनी मोबाईल बंद केल्याचे समजते. अशाप्रकारे कर्जाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्याच्या  तक्रारी रोज सायबर पोलिसांकडे येत आहेत.  स्वस्तात ट्रॅव्हल पॅकेज देण्याच्या नावाखाली आॅनलाईन गंडविण्यात आल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या.  विविध फंडे वापरून ३२ लाख ६० हजार १०९ रुपयांची फसवणूक झाल्याच्या तब्बल १६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

क्यूआर कोड पाठवून फसवणूक करण्याचा फंडानोकरी आणि व्यवसायाचे  आमिष दाखवून आॅनलाईन पैसे भरायला सांगून परराज्यातील भामटे राज्यातील बेरोजगारांची आॅनलाईन फसवणूक करीत आहेत. पेट्रोलपंपची एजन्सी देण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कोणतीही नामांकित कंपनी एजन्सी देण्यासाठी कायदेशीर करार  पूर्ण केल्यानंतर पैशाचा व्यवहार करीत असते.  ४क्यूआर कोड पाठवून स्कॅन करायला सांगून फसवणूक करण्याचा नवीन फंडा गुन्हेगार वापरत आहेत. क्यूआर कोड स्कॅन करताच बँक खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात वर्ग होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिवाय ओएलएक्सवर चारचाकी वाहन स्वस्तात देण्याची जाहिरात टाकून फसवणूक केली जात आहे. आॅनलाईन वस्तू खरेदी करताना ती वस्तू घरी आल्यावर पैसे द्यायला हवे.  आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी, असे पो. नि. बागवडे म्हणाल्या.

६ लाख ८५ हजार ७०० रुपये दिले परत मिळवूनशहर सायबर ठाण्यातील पोलिसांनी  केलेल्या जलद तपासामुळे महिनाभरात ६ लाख ८५ हजार ७०० रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले . फसवणूक झाल्यानंतर लगेच तक्रारदार ठाण्यात आल्यावर पैसे परत मिळविण्यासाठी तात्काळ पत्र व्यवहार करून भामट्यांच्या बँक खात्यातील रक्कम गोठविता येते . 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस