आॅनलाईन शिष्यवृत्ती ‘आॅफ’लाईनच्या गर्तेत !
By Admin | Updated: February 15, 2016 00:16 IST2016-02-15T00:01:49+5:302016-02-15T00:16:21+5:30
आशपाक पठाण , लातूर अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत हजारो विद्यार्थ्यांची नावेच आली नाहीत़ गेल्या पाच वर्षांपासून मिळालेली

आॅनलाईन शिष्यवृत्ती ‘आॅफ’लाईनच्या गर्तेत !
आशपाक पठाण , लातूर
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत हजारो विद्यार्थ्यांची नावेच आली नाहीत़ गेल्या पाच वर्षांपासून मिळालेली शिष्यवृत्ती यंदा अनेकांच्या हाती पडणार नसल्याने शाळा मुख्याध्यापक नव्या डोकेदुखीने चांगलेच धास्तावले आहेत़ अल्पसंख्यांक शिक्षण संचालकांनी २०१५-२०१६ शैक्षणिक वर्षात वगळण्यात आलेल्या शाळांची नावे समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या लातूर जिल्हा अल्पसंख्यांक शाळा मुख्याध्यापक संघाने याचा पाठपुरावा सुरू केला आहे़
शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून सुरू झालेल्या प्री मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागत होती़ गेल्या पाच वर्षांपासून हीच पध्दत रूढ होती़ मात्र, २०१५-१६ मध्ये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने आॅनलाईन पध्दती बंद करून आॅफलाईन पध्दतीने शाळा मुख्याध्यापकाकडून याद्या मागविल्या़ नवीन व नूतणीकरणाची यादी वर्ष संपत आले तरी अद्याप वेबसाईटवर अपलोड केले नाही़ शिक्षण संचालनायलयाने मंजूर याद्या थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविल्या आहेत़ जिल्हास्तरावर अद्यापही शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना त्या याद्या दिल्या नाहीत़ नव्या यादीत यावर्षी जिल्ह्यातील १०० शाळांची नावेच आली नसल्याचा दावा मुख्याध्यापक संघाने केला आहे़ नवीन, नुतणीकरणाची यादी वेबसाईटवर अपलोड करून शाळांनी माहिती द्यावी, ज्या शाळेचे यादीत नाव नाही, अशा शाळांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, अल्पसंख्यांक संचालनालायाच्या संचालकाकडे केली आहे़