कांद्याची फोडणी महागली
By Admin | Updated: July 8, 2014 00:34 IST2014-07-08T00:05:01+5:302014-07-08T00:34:53+5:30
नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत.
कांद्याची फोडणी महागली
नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत.
भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र अर्थिक झळ सोसावी लागत आहे. शहरातील बाजारात जिल्ह्याच्या विविध भागासह हिंगोली, परभणी, लासलगाव, नाशिक, पिंपगाव, बसवंत, सोलापूर, अहमदनगर, आंध्रा, कर्नाटक आदी ठिकाणाहून कांदा येतो.
पावसाळ््यास प्रारंभ होऊनही अद्याप पाऊस आलाच नसल्याने याचा परिणाम आठवडी बाजारावरही जाणवू लागला आहे. कांदा काढणीच्यावेळी बाजारात आठवड्यात ४० ते ५० गाड्या कांदा दाखल होत होता. यामुळे प्रतिक्विंटल दर ५० ते ६०० रुपयावर आले होते. मात्र आजघडीला आवकच कमी झाल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
शेतकरी त्यांच्याकडील कांदा काढणी केल्यानंतर तेव्हांच विक्री करुन मोकळा झाला. मात्र आज बाजारात येणारा सर्व कांदा व्यापाऱ्यांनी साठेबाजी करुन ठेवलेलाच आहे. यामुळे या भाववाढीचा शेतकऱ्यांना तीळमात्र फायदा होणार नसून व्यापारीच मालामाल होणार आहेत.
मे महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ४ रुपयापासून ८ रुपयापर्यंत होते. मात्र आवक घडल्यामुळे कांद्याचे दर २५ ते ३० रुपयावर जाऊन ठेपले आहेत. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडील कांदा संपतो त्यावेळी मात्र बाजारातील भाव गगनाला भिडतात. परंतु शेतकऱ्यांकडील कादां बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना फुकटभाव विक्री करावी लागतो. कांद्यांचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी दर ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. उत्पादित कांद्याची साठवणुक करण्यासाठी अधुनिक कांदाचाळ नसल्याने काढलेला कांदा, थेट बाजारात आणून विक्री करावा लागतो.
दरम्यान, कांद्यासह इतर भाजेपाल्या, पेट्रोल, डिझेलचे भावही सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य अगदी मेटाकुटीला आले आहेत़ त्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजाही संकटात सापडला आहे़ (प्रतिनिधी)