शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाच्या अजब त-हा; कचरा तुंबल्याचा राग काढला सफाई मजुरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 13:40 IST

कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.

ठळक मुद्दे शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत.

औरंगाबाद : शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हजारो मेट्रिक टन कचरा पावसाच्या पाण्याने अक्षरश: सडून दुर्गंधी पसरली आहे. ज्याठिकाणी कचऱ्याच्या पर्वतरांगा उभारण्यात आल्या आहेत, त्या भागातील नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत असतानाही महापालिका प्रशासन काहीच धोरणात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी उचलून टाकावा कुठे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.

नारेगाव येथे चार महिन्यांपासून कचरा टाकणे बंद आहे. शहरातील कचऱ्याची स्थिती सफाई मजूर आपल्या पद्धतीने रेटून नेत आहेत. काही वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून कचऱ्यावर प्रक्रियाही करण्यात येत आहे. २,५०० सफाई मजुरांच्या मेहनतीमुळे शहरात अद्याप तरी रोगराई पसरलेली नाही. वेळोवेळी कचरा उचलून ठिकठिकाणी टाकणे, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत करणे, आदी कामे मनपाच्या सफाई मजुरांनीच केली.  शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने घाटी रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता. या भागात मनपा आयुक्तY डॉ. निपुण विनायक गेले असता त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. महापालिकेची घंटागाडी येत नाही म्हणून आम्ही कचरा नाईलाजास्तव रोडवर टाकतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यावरून या भागातील सफाई मजूर गौतम बबन कांबळे याला सोमवारी  निलंबित करण्यात आले.

निरीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांना अभयमनपा प्रशासनाने कचराप्रश्नी एकट्या सफाई मजुरावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घाटी रोडवरील जयभीमनगर परिसरात घंटागाडी येत नाही, हे पाहण्याचे काम स्वच्छता निरीक्षकाचे आहे. त्यानेही कर्तव्यात कसूर केल्यास वॉर्ड अधिकारी आहेत. या दोघांना अभय का देण्यात आले. त्यांच्यावरही कारवाई करायला हवी होती, असे मनपातील कामगार संघटनांचे म्हणणे आहे. 

एका वॉर्डासाठी तीन रिक्षाजयभीमनगर घाटी या वॉर्डासाठी मनपा प्रशासनाने तीन रिक्षा दिल्या आहेत. कंत्राटदाराच्या या रिक्षा असून, एका रिक्षाचे भाडे दरमहा २९ हजार रूपये देण्यात येत आहे. तीन रिक्षांचे दरमहा भाडे जवळपास ९० हजार रूपये  होते. या भागात कचरा नेणारी रिक्षाच येत नसेल तर त्याला दोषी सफाई मजूर कसा? कंत्राटदार रिक्षा न पाठविता बिल वसूल करतोय का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न