एकाच मार्गाला रेल्वेने फोडले फाटे़़!
By Admin | Updated: April 4, 2015 00:34 IST2015-04-04T00:26:09+5:302015-04-04T00:34:11+5:30
श्रीपाद सिमंतकर, उदगीर बीदर-मुंबई रेल्वेगाडीच्या मंजुरीपासूनच गलथानपणा आणि दुर्लक्षामुळे प्रवाश्यांचे मोठे नुकसान झाले आहे़

एकाच मार्गाला रेल्वेने फोडले फाटे़़!
श्रीपाद सिमंतकर, उदगीर
बीदर-मुंबई रेल्वेगाडीच्या मंजुरीपासूनच गलथानपणा आणि दुर्लक्षामुळे प्रवाश्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ बीदर ते मुंबई (गाडी क्ऱ ११०७६) रेल्वेचा मार्ग लातूर रोड, उस्मानाबाद, पुणे व कल्याण असा आहे़ परतीच्या प्रवासाचा मार्गही हाच आहे़ परंतु, तिकीटावर मनमाड व परभणी असा असल्याने २० रु़ अतिरिक्त मोजावे लागत आहेत़
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने नवीन गाडी सुरु झाल्यानंतर मार्ग, थांबा, तिकीट आदी बाबी अपडेट केल्या जातात़ परंतु, ही रेल्वे सुरु होण्याच्या आधीपासून बीदर-मुंबई गाडीच्या नशिबी वनवासच आहे़ दिवसाच्या प्रवासाचे वेळापत्रक असले तरी मुंबईत अपरात्री पोहचून सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाने तिकीट व त्याच्या मार्गात अपडेट न केल्यामुळे प्रवाशांना तब्बल १७ कि़मी़ व २० रु़ च्या फरकाच्या तिकिटाचा फटका बसत आहे़ ही रेल्वे गाडी सुरु होताना आॅनलाईन आरक्षण अपडेट नव्हते़ ‘लोकमत’ ने यावर प्रकाश टाकल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने सिस्टीम अपडेट केली़ मात्र मध्य रेल्वेने ती अपडेट न केल्यामुळे सामान्य तिकीटावर मनमाड व परभणी मार्ग दिला जात आह़े़ त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ १७ मार्च रोजी उदगीर येथील कादरी यांनी कल्याण जंक्शनवर सामान्य तिकीट काढल्यानंतर ही बाब लक्षात आली़ कादरी यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना केबिनमध्ये बोलावून सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे हे होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले़ बीदर-मुंबई ही मध्य रेल्वेची गाडी असताना सिस्टीममध्ये अपडेट नाही़ मात्र ती पोहोचते त्या दक्षिण मध्य रेल्वेत मात्र अपडेट आहे़