दारु पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण

By | Updated: December 4, 2020 04:02 IST2020-12-04T04:02:03+5:302020-12-04T04:02:03+5:30

गणेश रामा जाधव (४२, रा. बजाजनगर) हे घरी असताना मंगळवारी (दि.१) रात्री ८ वाजेच्या सुमारास ओळखीचा प्रल्हाद किशनराव गुळभिले ...

One was beaten for not paying for alcohol | दारु पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण

दारु पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण

गणेश रामा जाधव (४२, रा. बजाजनगर) हे घरी असताना मंगळवारी (दि.१) रात्री ८ वाजेच्या सुमारास ओळखीचा प्रल्हाद किशनराव गुळभिले हा त्यांच्या घरी आला व दारु पिण्यासाठी पैसे मागितले. गणेशने पैसे देण्यास नकार देताच प्रल्हादने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत ढकलून दिले. खाली पडल्यामुळे गणेशच्या उजव्या पायातील रॉड सरकला. नातेवाईक सुलोचना सूर्यवंशी यांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

---------------------------------

बजाजनगरातून एक जण बेपत्ता

वाळूज महानगर : बजाजनगरातून ३३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली.

रितेश विष्णुपंत पैठणकर हे पंढरपूरातील एका बँकेत कनिष्ठ कारकून आहेत. रितेश यांचा पत्नीशी किरकोळ कारणावरुन वाद झाला व ती माहेरी निघून गेली. या वादानंतर बुधवारी रितेश यांची पत्नी तेजल या घरी आल्या. त्यांना पती घरी नसल्याचे दिसले.

बंब यांच्यावरील गुन्हा मागे घ्या

वाळूज महानगर : गंगापूर साखर कारखाना प्रकरणी आ. प्रशांत बंब व संचालक मंडळावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी रिपाइं (ए) च्यावतीने करण्यात आली. राजकीय हेतूने आ. बंब यांच्यावर विरोधकांनी गुन्हा दाखल केला आहे, असे पक्षाचे सचिव शरद किर्तीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

-------------------

बकवालनगरातून दुचाकी लंपास

वाळूज महानगर : बकवालनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जनार्दन तुकाराम पांचाळ यांनी नुकतीच दुचाकी खरेदी केली होती. २७ नोव्हेंबरला रात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी पळविली.

----

Web Title: One was beaten for not paying for alcohol