पाच आजारांसाठी एकच लस

By Admin | Updated: July 6, 2015 00:20 IST2015-07-05T23:45:39+5:302015-07-06T00:20:34+5:30

संजय तिपाले, बीड एक वर्षापर्यंतच्या बालकांना दोन वेगवेगळ््या लसी घ्याव्या लागत होत्या; परंतु आता फक्त एकाच इंजेक्शनमधून पाच आजारांचे नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ‘

One vaccine for five diseases | पाच आजारांसाठी एकच लस

पाच आजारांसाठी एकच लस


संजय तिपाले, बीड
एक वर्षापर्यंतच्या बालकांना दोन वेगवेगळ््या लसी घ्याव्या लागत होत्या; परंतु आता फक्त एकाच इंजेक्शनमधून पाच आजारांचे नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ‘हायफोकस’ जिल्ह्यातील बालकांसाठी ही खास लस विकसीत केली आहे. १ आॅगस्टपासून ही लस सरकारी दवाखान्यांमधून मोफत उपलब्ध होत आहे. अर्भकमृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
याआधी बालकांना त्रिगुणी (धनूर्वात, घटसर्प, डांग्या-खोकला प्रतिबंधक लस) व काविळ ब या दोन लसी स्वतंत्रपणे घ्याव्या लागत होत्या. मात्र, आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत २० टक्के बालके (एक वर्षाच्या आतील) श्वसनाच्या आजाराने मृत्यू पावतात, अशी माहिती उजेडात आली. त्यामुळे एक वर्षाखालील बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी त्रिगुणी, काविळ ब तसेच न्यूमोनिया अशा पाच आजारांसाठी एकच लस विकसीत करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीडसह जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील बालकांना या लसीचा लाभ घेता येणार आहे.
बालकांना (दीड महिने), (अडीच महिने) व (साडेतीन महिने) अशा तीन टप्प्यांत लसी द्यायच्या आहेत. पाच आजारांसाठी एकच लस आल्याने जादा इंजेक्शनपासून मुक्तता होईल.
बीडसह राज्यभर एक वर्षाखालील कोवळ्या जीवांच्या मृत्यूचा टक्का चिंताजनक आहे. खासगी दवाखान्यात पाच आजारांवरील लसीची किंमत दीड हजार रुपयांपर्यंत आहे. हीच लस शासकीय दवाखान्यांमध्ये नि:शुल्क मिळणार आहे. जिल्ह्यात एक वर्षाच्या आतील बालकांची संख्या ५७ हजाराहून अधिक आहे. या सर्वांना लसीचा लाभ घेता येऊ शकतो.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण लसीच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर एक तसेच तालुकापातळीवरही प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
बीड हायफोकसमध्ये असल्याने अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी पाच आजारांवर एकच लस उपलब्ध करण्यात आली आहे. एक आॅगस्टपासून सर्व सरकारी दवाखान्यांत ही लस मोफत आहे. आपल्या बालकांना लसी आवश्य टोचून घ्याव्यात.
- डॉ. एच. व्ही. वडगावे,
जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: One vaccine for five diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.