१९६ जागांसाठी एक हजार उमेदवारांचे अर्ज
By Admin | Updated: September 2, 2014 01:53 IST2014-09-02T01:08:07+5:302014-09-02T01:53:36+5:30
उद्धव चाटे , गंगाखेड बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्पांतर्गत केंद्र शासन नियुक्त १९६ अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत

१९६ जागांसाठी एक हजार उमेदवारांचे अर्ज
उद्धव चाटे , गंगाखेड
बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्पांतर्गत केंद्र शासन नियुक्त १९६ अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तब्बल १ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
कृषिप्रधान देशात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यातच शासन शासकीय कार्यालयाचे खाजगीकरण करीत असल्यामुळे जागा कमी अन् उमेदवार लाखोंच्या घरामध्ये आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर एका पदासाठी हजारो उमेदवार अर्ज करीत आहेत. त्यामुळे राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गंगाखेड तालुक्यात अतिरिक्त अंगणवाडी सेविकेच्या १९६ जागेसाठी १ हजार २५६ अर्ज दाखल झाले आहेत. हे अर्ज १६ ते २२ आॅगस्टपर्यंत मागविण्यात आले होते.
गंगाखेड तालुक्यामध्ये २१९ छोट्या-मोठ्या अंगणवाड्या आहेत. त्यात २३ अंगणवाड्या छोट्या आहेत. त्यासाठी मात्र अतिरिक्त अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार नाहीत. उर्वरित १९६ अंगणवाडीतील अतिरिक्त सेविकांची पदे भरण्यात येणार आहेत. या अंगणवाड्यांमध्ये कार्यकर्ती, मदतनीस व अतिरिक्त अंगणवाडी सेविका अशा तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)