रेल्वेगाडीसमोर एकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 21, 2014 23:20 IST2014-08-21T21:24:42+5:302014-08-21T23:20:07+5:30
हिंगोली : येथील स्थानकावर काचिगुडा- अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस पोहोचल्यानंतर कनेरगावकडे रवाना होत असताना एकाने इंजिन नंतरच्या डब्यासमोर उडी घेवून आत्महत्या केली.

रेल्वेगाडीसमोर एकाची आत्महत्या
हिंगोली : येथील स्थानकावर गुरूवारी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास काचिगुडा- अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस पोहोचल्यानंतर कनेरगावकडे रवाना होत असताना एकाने इंजिन नंतरच्या डब्यासमोर उडी घेवून आत्महत्या केली.
मयताचे नाव प्रकाश नारायण नन्नवरे (वय ४०, रा. रिसाला बाजार, हिंगोली) असल्याची माहिती रेल्वे पोलीस कर्मचारी प्रदीप गवळी यांनी दिली. सदरील व्यक्तीस बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात वार्ड क्र. ३ मध्ये दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी रुग्णालयातून पळून जावून त्याने रेल्वेसमोर आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याचे नातेवाईक जिल्हा रुग्णालय परिसरात शोध घेत असतानाच स्थानकावर ही घटना घडली. (प्रतिनिधी)