एकाच भूखंडाची दोन जणांना विक्री

By Admin | Updated: June 27, 2016 01:07 IST2016-06-27T00:43:36+5:302016-06-27T01:07:53+5:30

ओरंगाबाद : भूखंडाची रक्कम घेतल्यानंतर त्या भूखंडाची नोंदणीकृत खरेदीखत करून न देता तो भूखंड परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी

One plot is sold to two people | एकाच भूखंडाची दोन जणांना विक्री

एकाच भूखंडाची दोन जणांना विक्री


ओरंगाबाद : भूखंडाची रक्कम घेतल्यानंतर त्या भूखंडाची नोंदणीकृत खरेदीखत करून न देता तो भूखंड परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एक जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुलदीपसिंग ढोढी (रा.उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा येथील रहिवासी जसपालसिंग ओबेरॉय यांनी आरोपीकडून सातारा परिसरातील सर्वे नंबर ७१ मधील भूखंड क्रमांक ४७ हा हप्त्याने खरेदी केला होता. २० आॅगस्ट १९९७ रोजी त्यांनी कुलदीपसिंगला २५ हजार रुपये रोख दिले होते. शिवाय नंतर दरमहा सहा हजार रुपये याप्र्रमाणे रक्कम दिली. याबाबतच्या पावत्या कुलदीपसिंगने दिलेल्या आहेत. १९९९ मध्ये कुलदीपसिंगच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली होती. त्यानंतर दिलेल्या पैशाच्या पावत्या मात्र त्याने दिल्या नव्हत्या. भूखंडाची संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर या भूखंडाचे नोंदणीकृत खरेदीखत करून द्यावे, अशी मागणी वारंवार करूनही कुलदीपसिंगने खरेदीखत करून दिले नाही, उलट हा भूखंड कुलदीप कौर शिलेदार यांना विक्री केला. याबाबतची माहिती मिळताच ओबेरॉय यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ढोढीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक बहुरे तपास करीत आहेत.

Web Title: One plot is sold to two people