टाळ्या, हास्यकल्लोळात रंगला ‘वन मिनिट गेम शो!’

By Admin | Updated: September 21, 2014 00:38 IST2014-09-20T23:43:38+5:302014-09-21T00:38:47+5:30

औरंगाबाद : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने आयोजित ‘वन मिनिट गेम शो’मध्ये सख्यांनी धमाल मस्ती करीत अनेक बक्षिसे जिंकली.

'One minute game shows!' | टाळ्या, हास्यकल्लोळात रंगला ‘वन मिनिट गेम शो!’

टाळ्या, हास्यकल्लोळात रंगला ‘वन मिनिट गेम शो!’

औरंगाबाद : ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने आयोजित ‘वन मिनिट गेम शो’मध्ये सख्यांनी धमाल मस्ती करीत अनेक बक्षिसे जिंकली. यावेळी ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाच्या तरुण कलाकारांशी संवाद साधण्याची संधीही सखींना मिळाली.
आॅक्टोबरमध्ये ‘इश्कवाला लव्ह’ हा मराठी चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या टीमने सखी मंचच्या सदस्यांसोबत दिलखुलासपणे गप्पा मारल्या. यावेळी दिग्दर्शिका रेणू देसाईसह अभिनेता आदिनाथ कोठारे, नवोदित अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही, गायिका आनंदी जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी चित्रपटाची माहिती देताना सांगितले की, हा चित्रपट कुटुंबियांसह पाहण्यासारखा आहे. चित्रपटात आदिनाथ कोठारेची भूमिका एका चॉक लेट बॉयप्रमाणे आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सुलग्ना पाणिग्रही चित्रपटसृष्टीत प्रवेश करीत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना छोटे-मोठे किस्सेही सखींसोबत शेअर करण्यात आले. यावेळी गायिका आनंदी जोशी यांनी चित्रपटातील डोहाळे जेवणाच्या वेळी चित्रित केलेले गाणे सादर करून महिलांची दाद मिळविली. याशिवाय इतरही बरीच गाणी चित्रपटात असल्याचे तिने नमूद केले. एक आगळीवेगळी प्रेमकथा असलेला हा चित्रपट असल्याची माहिती टीमने दिली.
यावेळी रोहित कपूर यांनी एका मिनिटात संपतील असे अनेक गेम शो घेतले. या स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीत खुर्चीसह रुपया व वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्यासारखे अनेक गेम घेण्यात आले. टाळ्या आणि हास्यकल्लोळात स्पर्धा कधी संपल्या याची जाणीवही सखींना झाली नाही. म्युझिकल गेममध्ये तर महिलांना मोठ्या संख्येत सहभाग घेता आला. स्पर्धांची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तसेच सुरुवातीस छोट्या-छोट्या गोष्टींचे साम्य असलेल्या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांचा उत्साह पाहून सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांनी स्वत: पुढाकार घेऊन काही स्पर्धा घेतल्या. त्याचबरोबर विजेत्यांना बक्षिसांचेही वितरण केले.
यावेळी सखी मंचच्या अध्यक्ष रेखा राठी यांच्यासह मनीषा सोनी, गीता अग्रवाल, गीता सी. अग्रवाल, सरोज बगाडिया, बिना अग्रवाल, अरुणा काबरा, पद्मजा मांजरमकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: 'One minute game shows!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.