प्रवाशाचे एक लाख रुपये पळविले
By Admin | Updated: March 1, 2016 23:51 IST2016-03-01T23:36:16+5:302016-03-01T23:51:21+5:30
हिंगोली : शहरातील बसस्थानकातून मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास प्रवाशाच्या बॅगेतील एक लाख रूपये लंपास केल्याची घटना घडली.

प्रवाशाचे एक लाख रुपये पळविले
हिंगोली : शहरातील बसस्थानकातून मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास प्रवाशाच्या बॅगेतील एक लाख रूपये लंपास केल्याची घटना घडली.
हिंगोली येथील बसस्थानकात चोऱ्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील पोलिस संरक्षण वाढविणे गरजेचे झाले आहे. वसई येथील संतोष सावळे मंगळवारी हिंगोली बस स्थानकातून परभणीकडे जात होते. ते बसमध्ये चढताना त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग फाडून चोरट्यांनी त्यातील १ लाख रूपये लंपास केले. बसमध्ये बसल्यावर सदर प्रकार सावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिसांत घटनेबाबत कळविले. त्यानंतर शहर ठाण्याचे प्रभाकर शेटे, इंगोले व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत चोरट्याची शोधाशोध केली. परंतु गर्दीचा फायदा घेत चोरटा फरार झाला. याप्रकरणी सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती एपीआय संतोष पाटील यांनी दिली. तपास शेख शकील करीत आहेत. (प्रतिनिधी)