बोरगाव (माळी) येथे १ लाखांची चोरी

By Admin | Updated: September 9, 2014 23:59 IST2014-09-09T23:43:52+5:302014-09-09T23:59:16+5:30

लोहा : तालुक्यातील बोरगाव (माळी) येथे धाडसी चोरी झाली.

One lakh piracy at Borgaon (Mali) | बोरगाव (माळी) येथे १ लाखांची चोरी

बोरगाव (माळी) येथे १ लाखांची चोरी

लोहा : तालुक्यातील बोरगाव (माळी) येथे धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
बोरगाव (माळी) येथे मोतीराम अंबोरे यांचे घर आहे. ७ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी घरातील दोन खोल्यांचे कुलूप कापून आतमध्ये प्रवेश केला, दोन खोल्यांमधील पेटीत असलेले सोन्या- चांदीचे दागिने, नगदी रुपये अंगणातील मोटारसायकल असा एकूण १ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मोतीराम अंबोरे यांनी सोनखेड पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेवून गुन्हा दाखल केला. जमादार बशीर तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: One lakh piracy at Borgaon (Mali)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.