पीएच.डी.साठी दीड लाख; प्राध्यापिकेची गाईडशिप रद्द

By Admin | Updated: March 1, 2016 00:37 IST2016-03-01T00:10:23+5:302016-03-01T00:37:18+5:30

नजीर शेख ,औरंगाबाद पीएच. डी. साठी एका विद्यार्थिनीला सुमारे दीड लाख रुपये मागणाऱ्या एका महिला संशोधक मार्गदर्शकाची मान्यता (गाईडशिप) रद्द करण्याचा निर्णय सोमवारी

One lakh for Ph.D. Professors canceled the course | पीएच.डी.साठी दीड लाख; प्राध्यापिकेची गाईडशिप रद्द

पीएच.डी.साठी दीड लाख; प्राध्यापिकेची गाईडशिप रद्द


नजीर शेख ,औरंगाबाद
पीएच. डी. साठी एका विद्यार्थिनीला सुमारे दीड लाख रुपये मागणाऱ्या एका महिला संशोधक मार्गदर्शकाची मान्यता (गाईडशिप) रद्द करण्याचा निर्णय सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाच्या बीयूटीआर (बोर्ड आॅफ युनिव्हर्सिटी टीचर्स रिसर्च रिकग्नायझेशन) च्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जालना समाजकार्य महाविद्यालयातील ही प्राध्यापिका असून, आपल्या संशोधक विद्यार्थिनीला पीएच.डी. पूर्ण करून देण्यासाठी या प्राध्यापिकेने दीड लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. या विद्यार्थिनीने आपल्या आरोपाच्या पुष्टीसाठी प्राध्यापक आणि तिच्यामध्ये झालेल्या संवादाची आॅडिओ क्लीप’च सादर केली आहे. या मुलीने या महिला प्राध्यापिकेची कुलगुरू कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन विद्यापीठाने सोमवारी बीयूटीआरच्या बैठकीत निर्णय घेतला. सदर प्राध्यापिकेविरुद्ध यापूर्वीही पीएच.डी.साठी रक्कम मागितल्याचा आरोप होता. यापूर्वी आलेल्या तक्रारी तसेच काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीने सादर केलेली ‘आॅडिओ क्लीप’ यामुळे विद्यापीठाने कठोर निर्णय घेतला. स्वत: कुलगुरूंनी ही ‘आॅडिओ क्लीप’ ऐकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाने असा निर्णय घेतल्याच्या बाबीला बैठकीतील एका विभागप्रमुखानेही दुजोरा दिला.

Web Title: One lakh for Ph.D. Professors canceled the course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.