नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानला एक लाखांची देणगी
By Admin | Updated: November 19, 2014 13:10 IST2014-11-19T13:02:02+5:302014-11-19T13:10:19+5:30
नांदेड शहरातील नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानला गुरूश्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने एक लाख रूपयांचा निधी देणगी स्वरूपात दिला आहे.

नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानला एक लाखांची देणगी
नांदेड: शहरातील नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानला गुरूश्रद्धा मित्रमंडळाच्या वतीने एक लाख रूपयांचा निधी देणगी स्वरूपात दिला आहे. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. श्रीनिवास पांडे यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.
पीपल्स कॉलेजमध्ये १९६६ साली शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूश्रद्धा मित्रमंडळ स्थापन करून आपले गुरू प्रा. नरहर कुरूंदकर यांच्या स्मारकासाठी निधी दिला आहे. प्रा. डी. यु. देशपांडे आणि शरद देऊळगावकर यांनी या निधी संकलनासाठी पुढाकार घेवून १ लाख रूपयांचा निधी गोळा केला. हा निधी कुरूंदकर प्रतिष्ठानकडे एका कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला. डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. प्रभाकर गळेगावकर, डॉ. रेखा गळेगावकर, डॉ. दीनानाथ फुलवाडकर, प्रा. श्रीरंग हयातनगरकर, डॉ. एच. ए. माने, डॉ. वासुदेव विष्णूपुरीकर, प्रा. पी. वाय. कुलकर्णी, प्रा. विठ्ठल नारवाड यांची उपस्थिती होती. या देणगीबद्दल प्रतिष्ठानचे सचिव विश्वास कुरूंदकर, कोषाध्यक्ष डॉ. पांडे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी)