रेल्वेतून पडून एक ठार
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T14:09:23+5:302015-01-12T14:16:30+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव शिवारात रेल्वेतून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी समोर आली.

रेल्वेतून पडून एक ठार
बर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव शिवारात रेल्वेतून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी समोर आली. परळी - हैद्राबाद रेल्वेतून प्रवास करणारा एक व्यक्ती पट्टीवडगाव शिवारात तोल जाऊन पडला. धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट, कमरेला लुंगी आहे. ओळख पटली नसून बर्दापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन केले. (वार्ताहर)
सेवा विस्कळीत
लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यात मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. (वार्ताहर)