तीन अपघातात एक ठार, तिघे जखमी

By Admin | Updated: December 23, 2014 00:02 IST2014-12-23T00:02:57+5:302014-12-23T00:02:57+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या विविध अपघातात एकजण ठार झाला असून, तिघे जखमी झाले़ हे अपघात परंडा, उमरगा व परंडा-वारदवाडी मार्गावर

One killed, three injured in three accidents | तीन अपघातात एक ठार, तिघे जखमी

तीन अपघातात एक ठार, तिघे जखमी



उस्मानाबाद : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या विविध अपघातात एकजण ठार झाला असून, तिघे जखमी झाले़ हे अपघात परंडा, उमरगा व परंडा-वारदवाडी मार्गावर शनिवारी घडले असून, या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे़
पोलिसांनी सांगितले की, परंडा येथील पांडुरंग बोराडे हे शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-डब्ल्यू़९९७१) घराकडे जात होते़ त्यांची दुचाकीस ग्रामीण रूग्णालयासमोरील रोडवर कारने (क्ऱएम़एच़२५- आऱ ३००४ ) जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीस्वार बोराडे हे जखमी झाले़ या प्रकरणी बोराडे यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ गलांडे हे करीत आहेत़ परंडा-वारदवाडी मार्गावरून भूमकडे जाणाऱ्या स्कूलबसने (क्ऱएम़एच़२०- डब्ल्यू़९१३५) शनिवारी सायंकाळी पिंपळवाडी शिवारात कारला (क्ऱएम़एच़२५- आऱ २५२७) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील अ‍ॅड़ गुंजाळ, अ‍ॅड़ जाधव हे जखमी झाले़ या प्रकरणी पोपट मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कूलबस चालकाविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उमरगा शहरातील एका पेट्रोलपंपासमोरील रोडवर अज्ञात वाहनाने शनिवारी सायंकाळी जोराची धडक दिल्याने विनोद भोसले (रा़चिंचोली) यास जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनोद भोसले यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)४
येणेगूर : भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिल्याने एका हरणाचा मृत्यू झाला़ ही घटना मरूममोड नजीक सोमवारी सायंकाळी घडली़ मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम मोडनजीक महामार्गावरून जाणाऱ्या एका हरणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली़ या धडकेत हरणाचा मृत्यू झाला़ वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत इतर वाहनांनीही मयत हरणास चिरडल्याने त्याच्या शरिराचा चेंदामेंदा झाला होता़ घटनास्थळी धाव घेतलेल्या तालुका वन अधिकारी विठ्ठल व्हनाळे यांनी पंचनामा करून हरणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले़

Web Title: One killed, three injured in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.