जिकठाण फाट्याजवळ कार-दुचाकीला अपघात, एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:05 IST2021-02-05T04:05:26+5:302021-02-05T04:05:26+5:30
मथुराबाई कडुबाळ सुकासे (५५, रा. भगतवाडी, ता. गंगापूर) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे, तर लक्ष्मण अंबादास ...

जिकठाण फाट्याजवळ कार-दुचाकीला अपघात, एक ठार, एक जखमी
मथुराबाई कडुबाळ सुकासे (५५, रा. भगतवाडी, ता. गंगापूर) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे, तर लक्ष्मण अंबादास लहिंगे (३२, रा. सिरसगाव, ता. नेवासा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लक्ष्मण लहिंगे हे दुचाकी (क्रमांक. एमएच २०. सी. झेड. ६०२६) ने मावशी मथुराबाई सुकासे यांना सोबत घेऊन भगतवाडी येथून बजाजनगरकडे जात होते. जिकठाण फाटाजवळ पुण्याहून चंद्रपूरकडे जाणारी कार (एमएच १२. के. वाय. ९७९१)ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मथुराबाई सुकासे गंभीर जखमी झाल्या, तर लक्ष्मण किरकोळ जखमी झाल्याने त्यांना वाळुज पोलिसांनी उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मथुराबाई सुकासे यांचा मृत्यू झाला, तर लक्ष्मण यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात कारचालक तुकाराम भीमराव झाडे (४०, रा. कर्मवीर काॅलनी, वरुरा, जि. चंद्रपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय जारवाल करीत आहेत.
फोटो : कॅप्शन : जिकठाण फाट्याजवळ अपघातग्रस्त दुचाकी व कार.